dr-amol-kolhe-discussing-the-administrative-challenges-after-covid

पुणे : जुन्नर तालुक्यातील आमलेवाडी बोतार्डेच्या ऋतुजा प्रकाश आमले हिने दहावीच्या परीक्षेत ९९.६० गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले  परंतु घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार होते.मात्र ऋतुजाच्या स्वप्नांना आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आधार दिला आहे . घरची आर्थिक  परिस्थिती प्रतिकूल असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवून ,डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते ही बाब कौतुकास्पद असल्याचे म्हणत या मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिला मदत करण्याचं भाग्य लाभलं ही महत्त्वाची बाब असल्याची भावना खासदार डॉ कोल्हे यांनी व्यक्त केली. 

अत्यंत  गरीब कुटुंबातील ऋतुजाने दहावीचा अभ्यासाची तयारी करत असताना घराच्या भिंतीवर डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती.या तिच्या इच्छेसाठी खासदार डॉ कोल्हे यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत  तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.  सध्या तिला ऑनलाईन शिक्षण घेता यावे म्हणून  डॉ. कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’च्यावतीने   अॅण्ड्रॉईड मोबाईलही  भेट देण्यात आला.