डियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षपदी डॉ.अनिल आठरे यांची निवड

डॉ.सचिन वहाडणे, उपाध्यक्ष पदी डॉ.नरेंद्र वानखेडे, डॉ.सागर झावरेंची निवड अहमदनगर: इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए) अहमदनगर शाखेच्या अध्यक्षपदी प्रसिध्द जनरल सर्जन डॉ. अनिल आठरे यांची निवड झाली

डॉ.सचिन वहाडणे, उपाध्यक्ष पदी डॉ.नरेंद्र वानखेडे, डॉ.सागर झावरेंची निवड
अहमदनगर:
 इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए) अहमदनगर शाखेच्या अध्यक्षपदी प्रसिध्द जनरल सर्जन डॉ. अनिल आठरे यांची निवड झाली आहे. संघटनेच्या सेक्रेटरीपदी प्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ.सचिन वहाडणे यांची निवड झाली आहे.कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीावर कोणताही समारंभ न करता साधेपणाने नवीन पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला असल्याची माहिती डॉ.आठरे यांनी दिली.
प्रसिध्द युरोलॉजिस्ट डॉ,नरेंद्र वानखेडे,कॅन्सर तज्ञ डॉ.सतीश सोनवणे व फिजिशिअन डॉ.सागर झावरे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.डॉ.गणेश बडे खजिनदारपदी व जॉईंट सेक्रेटरी पदी डॉ.अशोक नरव डे, डॉ.रामदास बांगर,डॉ.अमित करडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ.एस.एस.दीपक,डॉ.बापुसाहेब कांडेकर, डॉ.अभिजित पाठक,फिजिशियन डॉ.सतीश फाटके यांच्यासहीत डॉक्टर उपस्थित होते. इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए)च्या सेंट्रल वर्किंग कमिटी(सीडब्लुसी)चे सदस्य डॉ.निसार शेख यांनी सांगितले की,सध्या जगभरात कोरोना महामारी ने थैमान घातले आहे.दिवसेंदिवस वाढणार्या रूग्णसंख्येबाबत आयएमए चिंतीत आहे.तसेच पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.कोरोना संकटाच्या सुरूवातीपासूनच नगरमध्ये आयएमए चे खासगी डॉक्टर जिल्हा सरकारी रूग्णालय,बूथ हॉस्पिटल,एम्स हॉस्पिटल मध्ये सेवा देत आहेत.
आयएमए चे सदस्य असलेले ४० भूलतज्ञ,४० फिजिशियन व २०सुपरस्पेशालिटी डॉक्टर तेथे सेवा देत आहेत.जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ शहरातील स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांनी विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये नॉन कोविड रूग्णांना मोफत सेवा दिली आहेत,अशी माहिती डॉ.अनिल आठरे यांनी दिली.