स्वारगेट ते सासवड मेट्राेचा प्रारुप अहवाल सादर ; महापालिकेच्या हद्दीबाहेर मेट्राेची सुविधा

दिल्ली मेट्रोने यापूर्वी दिलेल्या प्रारूप अहवालात गाडीतळ येथून सासवड येथील आयटी पार्क पर्यंत हा मार्गाचा विस्तार करणे आर्थिकदृष्ट्या आणि प्रवासी संख्येच्या दृष्टीने सोयीस्कर होऊ शकत नाही, असे म्हंटले होते. परंतु आता सादर केलेल्या सुधारीत प्रारूप अहवालात हा मार्ग फायदेशीर ठरण्यासाठी स्वारगेट ते सासवड रेल्वे स्टेशन असा दर्शविण्यात आला आहे.

    पुणे : दिल्ली मेट्राेने स्वारगेट ते सासवड रेल्वे स्टेशन या नवीन मेट्राे मार्गाचा प्रारुप अहवाल पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला ( पीएमआरडीए ) सादर केला आहे. या मार्गामुळे महापािलकेच्या हद्दीबाहेर मेट्राेची सुविधा उपलब्ध हाेईल.

    दिल्ली मेट्राेने शिवाजीनगर न्यायालय ते लोणीकाळभोर या १९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचा अहवाल नुकताच सादर केला आहे. या अहवालाबराेबरच स्वारगेट- रेसकोर्स- हडपसर मार्गे सासवड रेल्वे स्टेशन दरम्यानचा नवीन मेट्रो मार्गांचा सुधारीत प्रारूप अहवाल पीएमआरडीएला सादर केला आहे. हिंजवडी आयटी पार्क ते सासवड आयटी पार्क मेट्रो मार्गाने जोडण्याचे नियोजन यात केले गेले आहे. पीएमआरडीए िहंजवडी ते िशवाजीनगर असा मेट्राे मार्ग करणार आहे. हा मार्ग पुढे हडपसरपर्यंत वाढविण्यात यावा मागणी केली जात हाेती. त्यानुसार हा मार्ग फुरसुंगीपर्यंत वाढविला गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मार्गात बदल सुचवित िशवाजीनगर ते लाेणीकाळभाेर असा मार्ग करण्याची सुचना केली हाेती. तसेच पुरंदर तालुक्यात अांतरराष्ट्रीय िवमानतळही प्रस्तावित अाहे. याचा िवचार करून िशवाजीनगर ते सासवड हा मार्ग प्रस्तावित केला गेला हाेता. यासंदर्भात िदल्ली मेट्राेने पाठविलेल्या अहवालात पीएमअारडीएने काही बदल सुचवित सुधारीत अहवाल सादर करण्यास सांगितले हाेते. स्वारगेट ते पुलगेट आणि गाडीतळ ते लोणीकाळभोर मार्गांचा समावेश करण्यास सांगितले हाेते. िदल्ली मेट्राेने या सुचनांचा िवचार करून शिवाजीनगर ते लोणीकाळभोर हा १९ किलोमीटरचा इलेव्हेटेड मार्ग प्रस्तावित केला आहे. तर स्वारगेट ते सासवड रेल्वे स्टेशनपर्यंत दुसरा मार्ग प्रस्तावित केला अाहे.

    दिल्ली मेट्रोने यापूर्वी दिलेल्या प्रारूप अहवालात गाडीतळ येथून सासवड येथील आयटी पार्क पर्यंत हा मार्गाचा विस्तार करणे आर्थिकदृष्ट्या आणि प्रवासी संख्येच्या दृष्टीने सोयीस्कर होऊ शकत नाही, असे म्हंटले होते. परंतु आता सादर केलेल्या सुधारीत प्रारूप अहवालात हा मार्ग फायदेशीर ठरण्यासाठी स्वारगेट ते सासवड रेल्वे स्टेशन असा दर्शविण्यात आला आहे. त्यामध्ये स्वारगेट ते रेसकोर्स या तीन किलोमीटर लांबीचा तर हडपसर पासून सासवड रेल्वेस्टेशन असा सुमारे पाच किलोमीटरचा मार्ग नव्याने दर्शविण्यात आला आहे. तर रेसकोर्स ते हडपसर या दरम्यानचा मेट्रोमार्ग शिवाजीनगर ते लोणीकाळभोर आणि स्वारगेट ते सासवड रेल्वे स्टेशन या दोन्ही मार्गासाठी कॉमन सुचविण्यात आला आहे. जेणेकरून हिंजवडी ते सासवड आयटी पार्क हे दोन्ही एकमेकांना जोडले जाणार आहेत.