मंदिर उघडण्यासाठी ढोल वाजवून सरकारचा निषेध

मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आंबेगाव प्रखंड व खेड प्रखंड यांच्या वतीने राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ढोल वाजवा मंदिर उघडा आंदोलन करण्यात आले. ढोल, शंख वाजवून, भजन करुन सरकारचा निषेध करण्यात अाला.

मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आंबेगाव प्रखंड व खेड प्रखंड यांच्या वतीने राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ढोल वाजवा मंदिर उघडा आंदोलन करण्यात आले. ढोल, शंख वाजवून, भजन करुन सरकारचा निषेध करण्यात अाला.याबाबतचे निवेदन तहसिलदार, सहाय्यक पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले.

सरकारने लवकरात लवकर मंदिरे खुली न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी बजरंग दल आंबेगाव प्रखंड सहसंयोजक सुमित शिनगारे, खेड प्रखंड सहसंयोजक प्रतिक दौंडकर, अक्षय जगदाळे, ऋषी वाळुंज, प्रशांत साबळे, संकेत बारवे, अनिकेत डावखरे, अमोल शेवाळे, अमोल डमरे, भुषण चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र शासनाच्या आदेशानुसार इतर सर्व राज्यांमध्ये धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. पण महाराष्ट्र सरकारने अजूनही राज्यातील मंदिरे उघडली नाहीत.

 सोशल िडस्टन्स पाळून आंदोलन
राज्यभरातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडण्यात यावे, अशी मागणी वारंवार करुनही महाराष्ट्र सरकार परवानगी देत नाही. यासाठी राज्यात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोशल िडस्टन्स पाळून, मास्क लावून आंदोलन केले. ढोल, शंख वाजवून, भजन करुन सरकारचा निषेध करण्यात आला.