
बारामती : बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे हे अवैध सावकारांचे कर्दनकाळ ठरले असून बारामती परिसरातील नागवडे वस्ती येथील एका शेतक-याची कर्जाच्या बदल्यात अव्वाच्या सव्वा व्याज आकारुन एका खासगी सावकाराने लाटलेली तीन कोटी रुपये किंमतीची जमीन शिंदे यांच्या आदेशानंतर या शेतक-याला परत मिळाली.
बारामती : बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे हे अवैध सावकारांचे कर्दनकाळ ठरले असून बारामती परिसरातील नागवडे वस्ती येथील एका शेतक-याची कर्जाच्या बदल्यात अव्वाच्या सव्वा व्याज आकारुन एका खासगी सावकाराने लाटलेली तीन कोटी रुपये किंमतीची जमीन शिंदे यांच्या आदेशानंतर या शेतक-याला परत मिळाली.
बारामती शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पदभार नामदेव शिंदे यांनी खाजगी सावकारां विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.त्यामुळे सावकारी मध्ये अडकलेल्या अनेक सामान्यांना न्याय मिळत आहे. बारामती परीसरातील एका सावकाराने २०१७ मध्ये नागवडेवस्तीवरील एका शेतकऱ्याला त्याने दहा टक्के व्याजाने दहा लाख रुपयांची रक्कम दिली. संबंधित शेतकऱ्याने महिना लाख रूपये याप्रमाणे अठरा महिने पैसे देऊनही हा सावकार अजून त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी करत होता. इतके करून तो थांबला नाही, तर बारामती बाजार समितीतील गाळा आपल्या नावाने लिहून दे, म्हणून तो मागे लागला होता. सततच्या धमक्यांनी संबंधित शेतकरी घाबरला होता. पैसे दिले नाही तर तुझ्या जमिनीवर राजकीय वजन वापरून आरक्षण टाकायला लावीन अशीही धमकी त्याने दिली होती.
पोलिस नामदेव शिंदे यांनी सावकारांविरूद्ध उघडलेल्या मोहिमेच्या बातम्या वाचून संबंधित शेतकऱ्याने शिंदे यांच्या कडे मदतीची विनंती केली. शिंदे यांनी कागदपत्रांची मागणी करुन सावकाराला बारामती शहर पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले.
पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपण किती मोठे राजकीय नेते आहोत, आपल्या किती ओळखी आहेत याचा पाढा वाचून झाल्यावरही नामदेव शिंदे त्याला भीक घालत नाही उलट कारवाईची तयारी सुरू झाल्याने अखेर नरमलेल्या सावकाराने नांगी टाकत संबंधित जमीन त्या शेतकऱ्याला उलटून देण्याची तयारी दाखवली . जमीन उलटून पुन्हा त्याच्या नावे करून दिली.आजच्या बाजारभावाप्रमाणे या दीड एकराची किंमत तीन कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने पोलीसांचे आभार मानले आहेत.दरम्यान कोणीही सावकार त्रास , धमक्या देत असल्यास त्यांनी तातडीने पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नामदेव शिंदे यांनी केले. यापूर्वीही नामदेव शिंदे यांनी इंदापुर तालुक्यातील एका शेतकऱ्याची ६० लाख रुपये किंमतीची शेतजमीन त्याला परत मिळवून दिली होती.