वादळी पावसामुळे पुण्यात  १३ झाडे पडली

पुणे : शहरात वादळी पावसाने १३ झाडे पडल्याची माहिती अग्निशमक दलाने दिली आहे. मात्र, कोणत्याही ठिकाणी जीवित विंâवा वित्तहानी झाली नाही. कोथरुड, पाषाण आणि येरवडा परिसरात झाडे पडल्याची वर्दी

पुणे : शहरात वादळी पावसाने १३ झाडे पडल्याची माहिती अग्निशमक दलाने दिली आहे. मात्र, कोणत्याही ठिकाणी जीवित विंâवा वित्तहानी झाली नाही. कोथरुड, पाषाण आणि येरवडा परिसरात झाडे पडल्याची वर्दी अग्निशमक दलास मिळाली आहे.

जोरदार वादळी वारयासह पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहे.  लॉकडाउनमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. गुरुवारी रात्री सात वाजेनंतर पावसाने ठिकठिकाणी जोर धरला होता. पावसापेक्षा वारयाचा वेग जास्त असल्यामुळे जुने वृक्ष कोसळल्याची वर्दी अग्निशमक दलाला मिळाली. त्यानुसार कोथरुड, पाषाण आणि येरवडा हद्दीतील अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेउन रस्त्यावरील पडलेली झाडे बाजूला काढली. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरील झाडे हटविण्याचे कामकाज सुरु असल्याची माहिती अग्निशमक दलाच्या अधिकारयांनी दिली आहे