पाऊस झाल्याने शेतकरी रमले शेतीमशागतीच्या कामात

आर्थिक चणचण शेतकऱ्यांनी भासु लागली मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात गेल्या चार पाच दिवसात झालेल्या पावसामुळे शेतीमशागतीच्या कामांनी जोर धरला आहे. काही शेतकऱ्यांनी स्वताच्या बैलामार्फत

आर्थिक चणचण शेतकऱ्यांनी भासु लागली

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात गेल्या चार पाच दिवसात झालेल्या पावसामुळे शेतीमशागतीच्या कामांनी जोर धरला आहे. काही शेतकऱ्यांनी स्वताच्या बैलामार्फत खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी पुर्ण केली आहे. परंतु बियाणे,खते खरेदीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे आहे.

मागील तीन महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही बाजार समित्या बंद आहेत.त्यामुळे उत्पादित केलेला माल पाठवायचा कुठे. असा प्रश्न शेतकऱ्यासमोर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेती पिके घेण्याऐवजी शेती पडून ठेवली होती. तसेच दुधाला बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पाऊस झाल्याने खरीप हंगामासाठी शेतीमशागतीची कामे सुरु झाली आहे. तर काही गावांनी पेरण्या सुरु झाल्या आहेत. बाजरी,भुईमूग,कडधान्याची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी घेतलेल्या तरकारीचे पैसे न झाल्याने उत्पादित केलेली तरकारी पिके जनावरांचे खाद्य बनले होते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थजनावर झाल्याने बि बियाणे, खते आणण्यासाठी पैसे नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.