‘या’ गोष्टीमुळे बिबेवाडीत घडली आगीची घटना

इंटरनेटची केबल एका मोठ्या झाडाच्या फांदीतून गेल्यामुळे या झाडानेही याठिकाणी पेट घेतला होता. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या महावितरणच्या वीजवाहक ताराना ही आग लागली होती. नागरिक वेळीच सावध झाल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

    पुणे: बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील भारत ज्योती बस थांबा येथे इंटरनेटची केबल महावितरणच्या अतिउच्च दाब असलेली २२ के वी क्षमतेच्या वीज वाहक तारेवर पडल्यामुळे आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाला याची माहिती कळाल्यावर लगेच आग विझवण्याचे काम केले आहे.

    इंटरनेटची केबल एका मोठ्या झाडाच्या फांदीतून गेल्यामुळे या झाडानेही याठिकाणी पेट घेतला होता. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या महावितरणच्या वीजवाहक ताराना ही आग लागली होती. नागरिक वेळीच सावध झाल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.अग्नीशमन दलाची एक गाडी व देवदूतची एक गाडी यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. तारांवरूनच आडव्या तिडव्या पद्धतीने हे केबल चे जाळे विणले गेले आहे. केबलच्या ताराना उंच इमारती वरून आधार देण्याकरिता लोखंडी रोप फिरवला जातो.