कोरोनाच्या संकटकाळात दाम्पत्यांनी स्वीकारले गावातल्या झाडांचे पालकत्व

रावणगाव : आज संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने जनतेला वेठीस धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४मार्च पासून संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती या

 रावणगाव :  आज संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने जनतेला वेठीस धरले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४मार्च पासून संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती या काळामध्ये आपली व्यवस्था कशी होईल याबाबात विचार करत आहे.  शासनाने गोरगरिबांसाठी त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी धान्याची व्यवस्था केली आहे.  इतर समाजसेवी संस्था सुद्धा गोरगरिबांसाठी किराणा किटचे वाटप करीत आहे. कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत सर्व समाज आपल्या पोटाच्या खळगीसाठी विचार करताना दिसत असताना  दौड तालुक्यातील रावणगाव येथील लक्ष्मण तात्या राधवण व  त्यांच्या पत्नी कल्पना राधवण यांनी यापुढे  जाऊन  वृक्षांचे पालकत्व स्वीकारले आहे. वृक्ष लागवडी सोबतच त्यांच्या संगोपनाची व पाण्याची सोय या दाम्पत्यांनी केली आहे.या दोघांनी आपल्या गावामध्ये गोरगरिबांसाठी जीवनावश्यक वस्तूचे वाटप तर केलेच परंतु झाडाला पाणी कोण देणार याचा कोणीही विचार करत नसताना या  पती-पत्नीने दिनांक ९एप्रिल रोजी भर उन्हामध्ये आजूबाजूच्या सर्व झाडांना पाणी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करून  झाडाची सुद्धा भूक भावगली आहे.  

    कल्पना राधवण यांचे निसर्गावर प्रेम आहे. वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करण्यावर त्यांचा भर आहे. त्या  दिवसातून जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा झाडाला पाणी देतात.   त्यांना झाडाबद्दल एक वेगळेच प्रेम आहे. कोणतेही झाड लावले करते शेवटपर्यंत जगवायचे, त्याची जोपासना करायची असे कार्य त्या  नेहमी करत असतात.   त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की,  आज गरिबांना अन्नधान्याची गरज आहे त्याप्रमाणेच  झाडांनाही पाणी देण्याची गरज आहे म्हणूनच मी माझ्या गावातील वृक्षांना पाणी देण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे  सांगितले.