जेव्हा स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार चालवतात रिक्षा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती औद्योगिक वसाहतीतील पियाजिओ कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल घेत स्वत: इलेक्ट्रीक रिक्षा चालवली.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती औद्योगिक वसाहतीतील पियाजिओ कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल घेत स्वत: इलेक्ट्रीक रिक्षा चालवली. उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

    शनिवारी (दि. २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा होता. यावेळी त्यांनी पियाजिओ कंपनीला भेटी दिली. यावेळी इलेक्ट्रीक रिक्षाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी पवार यांनी बॅटरी रिचार्ज, त्यासाठीचा खर्च, रिक्षाची किंमत यासह सर्व बारीकसारीक गोष्टी जाणून घेतल्या. इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी चालते कशी, याचे कुतहूल उपमुख्यमंत्र्यांना देखील पडले. यावेळी त्यांनी या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची चौकशी केली व स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा चालवून पाहिली.

    दरम्यान, रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहने सोयीस्कर आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले.