शैक्षणिक संस्थांचा फीसाठी पालकांकडे तगादा

लोणी काळभोर :कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे गेल्या दोन महिन्यापासून उद्योजक ,व्यावसायिक ,कामगार,छोठे मोठे दुकानदार,मौलमजूर हातघाईला आले आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने उदरनिर्वाहाचा सामना

 लोणी काळभोर :कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे गेल्या दोन महिन्यापासून उद्योजक ,व्यावसायिक ,कामगार,छोठे मोठे दुकानदार,मौलमजूर हातघाईला आले आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने उदरनिर्वाहाचा सामना करावा लागत आहे.अश्या परिस्थितीत शालेय फी भरायची कशी असा प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मार्च अखेरपासून शाळा बंद आहेत.मुलांची वाहतूक करणाऱ्या बस ,रिक्षा ह्यादेखील बंद आहेत.परंतु काही खाजगी शाळाकडून शालेय फी भरण्यासाठी पालकांना तगादा लावला जात आहे.परिस्थिती नाजूक असणाऱ्या पालकांना मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. कामे बंद झाल्याने आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे.दिवसेंदिवस लॉकडाऊन वाढत चाललेले आहे.अश्या परीस्थितीत संसाराचा गाडा ओढायचा कि शालेय फी भरायची असा प्रश्न पालकांना पडला आहे.

एकीकडे शासनाकडून सर्व शाळांना आदेश देण्यात आले आहेत.शक्यतो शालेय फी साठी पालकांना तगादा न लावता टप्प्या टप्प्याने फी घ्यावी मात्र काही खाजगी शाळांकडून पालकांना फोनद्वारे तसेच शालेय वॅटस ऑप ग्रुपद्वारे मेसेज करून फी भरण्याची मागणी केली जात आहे.

"काही शाळा विद्यार्थ्यांकडून बळजबरीने फी वसूल करत असल्याच्या तक्रारी आला आहेत जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक पुणे यांच्याकडून सर्व शाळांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे कि विद्यार्थ्यांकडून सध्य स्थितीत कोणत्याही प्रकारची फी वसुली करू नये."

रामदास वालझडे, गटशिक्षण अधिकारी हवेली