कोरोनाबाधित रुग्णांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न

शिक्रापूर : सध्या मोठ्या प्रमाणात फैलाव होत असलेल्या कोरोना महामारीमध्ये कोरोना बाधित रुग्णांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून, ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

सणसवाडी (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या पाठपुराव्यामुळे १५० बेडचे कोविड सेंटर सुरु करण्याचे नियोजन आमदार अशोक पवार व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. सदर कोविड सेंटरचे उद्घाटन नुकतेच कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्रापूर व सणसवाडी ग्रामपंचायतच्या वतीने चौदाव्या वित्त आयोग निधीतील दोन रुग्णवाहिकांचा देखील लोकार्पण करण्यात आले आहे. आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, बाजार समितीचे उपसभापती विकास शिवले, माजी सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, संचालक आबाराजे मांढरे, अनिल भुजबळ, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, प्रशासक जगन्नाथ काळे, राष्ट्रवादी कॉंगेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवने, राजेंद्र सात्रस, बापूसाहेब गोरे, सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच नवनाथ हरगुडे, पंडित दरेकर, गौरव करंजे, निलेश थोरात, सुभाष खैरे, काकासाहेब चव्हाण यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, कोरोना काळामध्ये शिरूर लोकसभा मतदार संघात सर्वात प्रथम कोविड केअर सेंटर व स्व्याब सेंटर देखील सुरु करण्यात आलेले असल्याचे देखील खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

-तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे – संतोषकुमार देशमुख ( प्रांताधिकारी )
शिरूर तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ३८०० झालेली असून त्यापैकी ३१९३ रुग्ण बरे झालेले आहेत, तर सध्या ५१८ सध्या कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत आणि शिरूर तालुक्यामध्ये शासकीय पाच व्हेंटीलेटर असून खासगी ३६ व्हेंटीलेटर असलेले बेड शिरूर तालुक्यात असून बेड वाढविण्यासाठी देखील प्रयत्न सुरु असल्याचे सांगत शिरूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे असे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.

-नागरिकांनी हॉस्पिटलचे बिल जपून ठेवावे 
शासनाकडे आग्रह धरून शिरूर व न्हावरा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केले, कंपन्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले नंतर प्रशासनाला सर्व काही करावे लागत आहे, मात्र कंपन्यांनी देखील पुढे येणे गरजेचे आहे, शिरूर तालुक्यामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये देखील कोविड उपचार सुरु आहेत मात्र सर्व हॉस्पिटलचे शासकीय ऑडीट देखील होणार आहेत, त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांनी रुग्णालयातील बिले जपून ठेवल्यास हॉस्पिटलचे ऑडीट झाल्यानंतर जादा गेलेले पैसे देखील नागरिकांना मिळणार आहेत म्हणून नागरिकांनी हॉस्पिटलचे बिल जपून ठेवावे असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले आहे.

– शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याची मागणी : खासदार अमोल कोल्हे
सध्याच्या पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून सदर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याची मागणी आपण केलेली असून शेती संदर्भातचे विधेयक लागू करायचे नाही असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचे यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सागितले.