वाघोली(ता.हवेली) येथे दिव्यांग मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अशोक पवार,सरपंच वसुंधरा उबाळे सह मान्यवर.
वाघोली(ता.हवेली) येथे दिव्यांग मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अशोक पवार,सरपंच वसुंधरा उबाळे सह मान्यवर.

वाघोली:शहरांमध्ये बाहेरच्या राज्यातील अनेक नागरिकांना शासनाच्या वतीने घरे दिली जात आहेत.त्याचप्रमाणे दिव्यांग देखील नागरिक आहेत त्यांना ही हक्काची घरे मिळवून देण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार अँड.अशोक पवार यांनी केले.पवार म्हणाले,दिव्यांग बांधवांना दिलासा देणे आमचे काम असून,ज्या ज्या वेळी गरज लागेल तेव्हा आम्ही दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहू,नुसते शिरूर-हवेली पुरतेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगासाठी कामे करणार आहोत.पवार यांनी मार्गदर्शन करताना शेवटी धर्मेंद्र सातव पूर्ण जिल्ह्यात दिव्यांग बांधवाना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देत आहे.त्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

वाघोली(ता.हवेली) येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन या दिव्यांग संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.यामध्ये रक्तदान शिबिर,दिव्यांगांचे व्हील चिअरचे वाटप,दिव्यांग हक्क कायदा पुस्तकांचे वाटप,विविध कल्याणकारी शासकीय योजनांची माहिती मार्गदर्शन,तसेच दिव्यांगांना अल्प उपहार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तर दिव्यांगास व्हिलचर भेट देण्यात आल्या.तसेच दिव्यांग व्यक्तीना धर्मेंद्र सातव याच्या तर्फे आमदार अशोक पवार याच्या हस्ते दिव्यांग हक्क कायदा या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी वाघोलीत मागण्याचे फलक घेऊन दिव्यांगानी जनजागरण रॅली काढली.विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या दिव्यांगांचा सन्मान आमदार अशोक पवार याच्या हस्ते करण्यात आला.
यावेळेस कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार अरूण खोरे,वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे,माजी सरपंच शिवदास उबाळे,भाजप कार्यकारिणीचे प्रदेश सदस्य गणेश कुटे,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संदीप थोरात,उद्योजक गणेश सातव,प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव,प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा कार्याध्यक्षा सुप्रिया लोखंडे,हरिदास शिंदे,अनिता काबळे,विजय पगडे, साहेबराव जगताप,बापू कोपरे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा कार्याध्यक्षा सुप्रिया लोखंडे यांनी केले.

दिव्यांग हक्क डावलणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करू:आयुष प्रसाद
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांचे हक्क डावलणाऱ्या ग्रामपंचायतीवर योग्य ते कारवाई करणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केले.पुढे ते म्हणाले दिव्यांगांच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५ टक्के निधी खर्च करण्याची तरतूद असताना अनेक ठिकाणी हा निधी खर्च केला जात नाही. हे दिव्यांगाना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवल्या सारखे आहे त्यामुळे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना राबविणार आहे.