स्थानिक तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार अॅड.अशोक पवार

शिरूर : औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या व कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी तसेच स्थानिक तरूणांना कंपन्यांमध्ये काम मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न करण्यात येत

शिरूर : औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या व कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी तसेच स्थानिक तरूणांना कंपन्यांमध्ये काम मिळवून  देण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिरूर हवेलीचे आमदार अॅड.अशोक पवार यांनी  सांगितले.रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या अधिका-यांची बैठक शिरूर तहसिल कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली यावेळी आमदार पवार बोलत होते.

            यावेळी उपविभागिय अधिकारी संतोषकुमार देशमुख,तहसिलदार लैला शेख,नायब तहसिलदार श्रीशैल्य व्हट्टे,रांजणगावचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक मुजफ्फर कुरेशी,युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे यांसह कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा सामना सर्वांना करावा लागला असुन या कालावधीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्या बंद असल्याने मोठ्या प्रमाणावार कामगार आपापल्या राज्यात निघुन गेले असुन लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कंपन्या सुरु झाल्या मात्र कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कामगारांची कमतरता जाणवत असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे.

              कंपन्यांमधील कामगारांची कमतरता प्रशासनाच्या मदतीने दुर करण्यासाठी उपविभागिय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या सुचनेनुसार रांजणगाव औद्योगिक वसागतीतील कंपनीच्या अधिका-यांची बैठक बोलवुन स्थानिक तरूणांना या कंपन्यांमध्ये काम मिळवुन देण्यासाठी प्रयत्न सुरू असुन तरी ही कामगारांची कमतरता भासल्यास इतर ठिकाणांहुन ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तसेच लाॅकडाऊन पुर्वी व लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर कंपन्यांच्या समस्या व काय परिस्थिती आहे याबाबत माहिती देण्याच्या सुचना देवुन त्या सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अॅड.अशोक पवार यांनी

“कंपनी  प्रशासनाने स्वतःसह कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असुन टेंम्परेचर तपासणी, सोशल डिस्टन्सींग,सॅनिटायझींग,रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबरोबरच प्रशासनाकडुन दिलेल्या सुचनांचे व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. “

 -आमदार अॅड.अशोक पवार , शिरूर हवेली