जुगार खेळणाऱ्या आठ जणांना अटक;  २२ हजाराचा मुद्देमाल जप्त

आरोपी भोंडवे कॉर्नर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये रम्मी नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार एका पथकाने या जुगार अड्डयावर छापा मारला. त्यात आठ जणांना अटक करून त्यांच्याकडून २३ हजार ६० रुपये रोख रक्कम आणि ५० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण २३ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    पिंपरी: जुगार खेळणाऱ्या आठ जणांना सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून २२ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई भोंडवे कॉर्नर, रावेत येथे करण्यात आली.
    दामू शिवाप्पा राठोड (वय ४०, रा. बावधन), गणेश सोमू राठोड (वय ३६, रा. कैलासनगर, वाकड) आणि अन्य सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई राजेश कोकाटे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोंडवे कॉर्नर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये रम्मी नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार एका पथकाने या जुगार अड्डयावर छापा मारला. त्यात आठ जणांना अटक करून त्यांच्याकडून २३ हजार ६० रुपये रोख रक्कम आणि ५० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण २३ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.