आठ महिन्याच्या चिमुकलीला ऑफिसमध्ये झोपवून आई पसार

बाळाला तिकीट बुकिंग ऑफिस मध्ये झोपवून महिला स्वच्छतागृहात जाऊन येते असे सांगून निघून गेली. ती परत आलीच नाही.

    पिंपरी: ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये आठ महिन्याच्या चिमुकलीला झोपवून आई निघून गेल्याची धक्कादायक घटना आळंदी येथे समोर आली आहे.
    एका महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदीमधील चाकण चौकात खुशाल ट्रॅव्हल्स या कंपनीचे ऑफिस आहे.

    एक अनोळखी महिला ट्रॅव्हल्सच्या तिकीट बुकिंग ऑफिस मध्ये आली. तिच्याजवळ सात ते आठ महिन्याची बालिका होती. बाळाला तिकीट बुकिंग ऑफिस मध्ये झोपवून महिला स्वच्छतागृहात जाऊन येते असे सांगून निघून गेली. ती परत आलीच नाही. आळंदी पोलीस तपास करत आहेत.