अ.भा.वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी भाडळे

वाघोली: अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी वाघोली (ता:हवेली) येथील रामेश्वर शास्त्री प्रसादिक दिंडी मंडळाचे संस्थापक संचालक कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष हभप राजेंद्र मारुती भाडळे यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष, हभप अनिल महाराज वाळके तसेच विभागीय अध्यक्ष हभप आनंद तांबे यांच्या शिफारसीने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांनी तीन वर्षांसाठी पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून राजेंद्र भाडळे याची निवड केली आहे.