कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध ;औपचारीक घोषणा बाकी

या पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी चौदा नव्या चेह-यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर मागील पाच वर्षांच्या काळात संचालक असणा-या भरत शहा,हनुमंत जाधव,केशव दुर्गे,आबासाहेब शिंगाडे व वसंतराव मोहोळकर या पाच जणांसह सन २००८ ते २०१४ या कालावधीत संचालक असणा-या सतीश व्यवहारे यांना पुन्हा संचालक मंडळात घेतले आहे.

  इंदापूर: उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आज(दि.१२) च्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात राहिल्याने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. या पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी चौदा नव्या चेह-यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर मागील पाच वर्षांच्या काळात संचालक असणा-या भरत शहा,हनुमंत जाधव,केशव दुर्गे,आबासाहेब शिंगाडे व वसंतराव मोहोळकर या पाच जणांसह सन २००८ ते २०१४ या कालावधीत संचालक असणा-या सतीश व्यवहारे यांना पुन्हा संचालक मंडळात घेतले आहे.

  बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची नावे अशी :
  इंदापूर गट – भरत शहा,शांतीलाल शिंदे,रवींद्र सरडे.

  कालठण गट – हर्षवर्धन पाटील, हनुमंत जाधव,छगन भोंगळे. शेळगाव गट- बाळासाहेब पाटील,राहुल जाधव,अंबादास शिंगाडे.

  भिगवण गट – पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड.

  पळसदेव गट – भूषण काळे, प्रवीण देवकर,रतन देवकर, महिला राखीव – शारदा पवार,कांचन कदम.

  अनुसूचित जाती जमाती – केशव दुर्गे.

  इतर मागास प्रवर्ग – सतीश उद्धव व्यवहारे.

  भटके विमुक्त जाती प्रवर्ग – हिरा पारेकर.

  ‘ब’वर्ग प्रतिनिधी – वसंत मोहोळकर.