शर्जील उस्मानीची चार तास कसून चौकशी; जाबाब नोंदवून पोलिसांनी केली तात्पुरती सुटका

कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून आरोपी शर्जील उस्मानीला नोटीस बजावत आहोत. त्याप्रमाणे तो चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहिला आणि त्याने चौकशीत सहकार्य केले तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी मुंबई हायकोर्टात दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या नोटीसप्रमाणे शर्जील गुरुवारी चौकशीसाठी हजर राहिला. त्याची सुमारे चार तास चौकशी केली, असे उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.

    पुणे : एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी शर्जील उस्मानीची गुरुवारी कसून चौकशी करण्यात आली. स्वारगेट पोलिस ठाण्यात त्याने हजेरी लावल्यानंतर पोलिसांनी शर्जीलचा जबाब नोंदवून त्याला सोडण्यात आले.

    आम्ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून आरोपी शर्जील उस्मानीला नोटीस बजावत आहोत. त्याप्रमाणे तो चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहिला आणि त्याने चौकशीत सहकार्य केले तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी मुंबई हायकोर्टात दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या नोटीसप्रमाणे शर्जील गुरुवारी चौकशीसाठी हजर राहिला. त्याची सुमारे चार तास चौकशी केली, असे उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.

    पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत 30 जानेवारीला एल्गार परिषद पार पडली होती. या परिषदेत शर्जीलला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शर्जीलने हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

    पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एफआयआर रद्द करण्यासाठीची याचिका शर्जीलने केली आहे. स्वारगेट पोलिसांनी पुढील तपासाच्या दृष्टीने गुरुवारी त्याची चौकशी करून जबाब नोंदवला आहे. आता या प्रकरणी 22 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.