कुरकुंभ परिसरात ‘एक गाव एक गणपती’ मंडळाची स्थापना

गणपती – मोहरम शांतता कमिटी बैठकीत सर्वानुमते निर्णय 

कुरकुंभ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील कुरकुंभ पोलीस मदत केंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या कुरकुंभ, पांढरेवाडी, वासुंदे , कौठडी,  जिरेगाव  या गावातील गणपती मंडळाच्या अध्यक्ष , सदस्य यांची कुरकुंभ पोलीस मदत केंद्रात बुधवार( ता.१९ रोजी ) या बैठकीचे आयोजन केले होते.  यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तेजस मोहिते यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी मोहिते म्हणाले की सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक गाव एक गणपती अशी  संकल्पना राबवावी असे आव्हाहन यावेळी मोहिते यांनी केले आहे. 

पुढे बोलताना मोहिते म्हणाले की गणेश मूर्ती ची स्थापना गावातील ग्रामदैवत असणाऱ्या मंदिरात करावी मूर्तीची स्थापना व विसर्जन कमीत कमी पाच ते सात माणसांमध्ये करणे, दररोज आरती साठी वाड्या वस्तीवरील मंडळाच्या पाच पदाधिकाऱ्यांना मान दिला जाईल सार्वजनिक जेवण व कोणतेही कार्यक्रम करू नये. आरती वेळेस   साबणाने हात स्वछ धुवावे व  मास्क चा वापर करावा, सार्वजनिक गणेश उत्सव नियम पाळून साजरा करावा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सवॆ कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी.नियमाचे उल्लंघन केले तर त्यांच्या वर कारवाई करण्यात येईल असे सांगितले .

यावेळी कुरकुंभ पोलीस  मदत केंद्राचे के. बी शिंदे, पंडित मांजरे, दत्तात्रय चांदणे,  ग्रामपंचायत सदस्य विनोद शितोळे,  पांढरेवाडी चे पोलीस पाटील विलास येचकर यावेळी उपस्थित होते. कुरकुंभ पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा च्या  फोन द्वारे सर्व गावातील नागरिकांना एक गाव एक गणपती बसवावा याबाबत सूचना दिल्या आहेत.