आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून आगामी अतिवृष्टी,नैसर्गिक आपत्ती,पूर यासारख्या घटनांचा तातडीने आढावा घेण्यासाठी आणि कार्यवाही करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली.

 तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून आगामी अतिवृष्टी,नैसर्गिक आपत्ती,पूर यासारख्या घटनांचा  तातडीने आढावा घेण्यासाठी आणि कार्यवाही करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली. असून सदर नियंत्रण कक्षामध्ये २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाचे आदेशानुसार मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी हा नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. या कक्षात २४ तास दोन ते तीन कर्मचारी थांबणारा असून शहराची अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती,पूर यासारख्या घटना बाबत सतर्क राहून परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने त्या बाबत कार्यवाही करण्यासाठी अहवाल। नियुक्त झालेले अधिकारी प्रशासनाला सादर करतील असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. १जून २०२० पासून या नियंत्रण कक्षाचे कामकाजाचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच त्यावर नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना लेखी आदेशही देण्यात आलेले आहेत. नगरपरिषद कार्यालयात सकाळी ६ ते  दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० व रात्री १० ते सकाळी ६ अशी तीन पाळ्यामध्ये नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांची ड्यूटी राहणार आहे. हे आपत्ती कक्ष जून ते सप्टेंबर अखेर राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी झिंजाड त्यांनी दिली.