कोरोनात्तोर काळातही विवाहासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीचा कायदा करावा

राहुरी: सध्याचे कॊरोना महामारी संकटात काही शिस्ती आपल्या आत्मसात कराव्या लागल्या यापुढील काळात विवाह हा पन्नास नातेवाईकांच्या साक्षीने करण्याचा कायदा करण्यात यावा अशी मागणी मागणी

 राहुरी : सध्याचे कॊरोना महामारी संकटात काही शिस्तीच्या गोष्टी सर्वाना आत्मसात कराव्या लागल्या, यापुढील काळात विवाह हा पन्नास नातेवाईकांच्या साक्षीने करण्याचा कायदा करण्यात यावा, अशी मागणी  मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दाहतोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.


याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात दाहतोंडे यांनी म्हटले आहे की,सध्याचे संकट तसेच काळाची गरज म्हणून हा कायदा करण्यात आला आहे आणि लोकही या कायद्याच्या अंमलबजावणी करत केवळ पन्नास किंवा त्यापेक्षा ही कमी लोकांतही सध्या विवाह पार पडत आहेत, एकट्या अहमदनगर जिल्ह्यात एक हजारहून अधिक विवाह या पद्धतीने झाले आहेत.


गेल्या अनेक वर्षे भव्य दिव्य लग्न सोहळा करणे ही एक प्रथा झाली आहे, खोटया  प्रतिष्ठेपाई  ऐपत नसतांना लोक भरमसाठ खर्च करतात,त्यात पत्रिका छपाई त्यात नाव टाकण्यावरून मान अपमान, रुसवेफुगवे, हजारो लोकांच्या जेवणावळी,पुढाऱ्यांच्या सत्कार,त्यांचे आशीर्वाद,या अनावश्यक गोष्टीवर लाखो रुपये खर्च होतो. ज्यांच्याकडे पैसा आहे ते वारेमाप खर्च करतात .अनेकदा नाईलाजास्तव  लोक यात भरडले जातात व कर्जबाजारी होतात.


सरकारने सध्या घालून दिलेल्या नियमात लग्न होताहेत,त्याबद्दल सध्या तरी कोणाची तक्रार नाही,न होण्यापेक्षा कसं का होईना झालेलं बरं अस मानून लोकांनीही हा नियम स्वीकारला आहे.सरकारने सध्याच्या या  नियमाचे कायद्यात रूपांतर करावे व त्याची कडक अंमलबाजवणी करावी, त्यामुळे गरीब श्रीमंत व सर्वच समाजाला याचा फायदा होईल असा विश्वास दाहतोंडे यांनी व्यक्त केला आहे.


"ज्या लोकांना पन्नासहून अधिक लोक लग्नासाठी आणायचे असतील त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडून परवानगी घ्यावी व पन्नास हुन अधिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती साठी एक हजार रुपये आकारणी करण्यात यावी व ही रक्कम दरवर्षी जिल्हा स्तरावर शासनाने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून त्यासाठी खर्च करण्यात यावी असा पर्याय ही दाहतोंडे यांनी सुचवला आहे.