८ कार्यकारी अभियंता, २९ उपअभियंत्यांच्या अदल्या-बदल्या

महापालिका प्रशासन विभागाने एकाच डिपार्टमेंटमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागविली होती. त्यानुसार एकाच डिपार्टमेंटमध्ये अनेक वर्ष कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेतील स्थापत्य, विद्युत, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३ सह शहर अभियंता, ८ कार्यकारी अभियंता, २९ उपअभियंता आणि ४ सहायक आरोग्य अधिकारी अशा ४४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश सुटीच्या दिवशी (रविवारी) काढत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १५ दिवसाच्या आत बदली ठिकाणी रुजू व्हावे अन्यथा कारवाईचा करु इशारा देण्यात आला आहे.

    महापालिका प्रशासन विभागाने एकाच डिपार्टमेंटमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागविली होती. त्यानुसार एकाच डिपार्टमेंटमध्ये अनेक वर्ष कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, अतिक्रमण निर्मूलन अशोक भालकर यांच्याकडे स्मार्ट सिटी, ड आणि ह क्षेत्रीय कार्यालय, पंतप्रधान आवास योजना, ईडब्ल्यूूएस आणि सतीश इंगळे यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन, क्रीडा, उद्यान स्थापत्य विभागाची जबाबदारी सोपविली आहे. कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे यांची क क्षेत्रीय कार्यालय, राजेंद्र राणे यांची पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागात, संजय भोसले यांची बांधकाम परवानगी विभागात आणि संजय घुबे यांची बांधकाम परवानगी विभागात बदली करण्यात आली आहे. विद्युत कार्यकारी अभियंता शशिकांत मोरे यांची क क्षेत्रीय कार्यालय, संजय खाबडे यांची फ क्षेत्रीय कार्यालय, नितीन देशमुख यांची मुख्य कार्यालय आणि प्रवीण घोडे यांची अ क्षेत्रीय कार्यालयात बदली केली आहे. तर, उपअभियंता लता बाबर यांची इ क्षेत्रीय विद्युत कार्यालय आणि बाळू लांडे यांची अ क्षेत्रीय विद्युत कार्यालयात बदली झाली आहे.

    स्थापत्य विभागातील २७ उपअभियंत्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सुनिल शिंदे (क क्षेत्रीय), नरेश रोहिला (मुख्यालय स्थापत्य), विजय भोजने (बांधकाम परवानगी), दीपक पाटील (ग क्षेत्रीय पाणीपुरवठा), विजय जाधव (पाणी पुरवठा), मोहन खोंद्रे (स्थापत्य मुख्यालय), सुभाष काळे (नगररचना), चंद्रशेखर धानोरकर (बीआरटीएस), वैभव पुसाळकर (क्रीडा स्थापत्य), सुनिल पाटील (स्थापत्य मुख्यालय), सुनिल नरोटे (ड क्षेत्रीय स्थापत्य), लक्ष्मण जाधव (ई क्षेत्रीय), संध्या वाघ (ग क्षेत्रीय), देवेंद्र बोरावके (स्थापत्य उद्यान), राजेद्र शिंदे (फ क्षेत्रीय), सतीश वाघमारे (स्थापत्य मुख्यालय), भाऊसाहेब साबळे (नगररचना), विनय ओव्हाळ (ड क्षेत्रीय), महेश तावरे (ग क्षेत्रीय कार्यालय), जयकुमार गुजर (ह क्षेत्रीय स्थापत्य), रविंद्र भोकरे (पाणीपुरवठा), बाळासाहेब शेटे (अ क्षेत्रीय), प्रकाश सगर (क क्षेत्रीय), नरेश जाधव (पर्यावरण), राजेंद्र क्षीरसागर (उद्यान स्थापत्य), राजकुमार सुर्यवंशी (नगररचना) आणि विजयकुमार शिंदे (पाणीपुरवठा व जलनि:सारण) यांचा बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे.

    सहायक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांची क क्षेत्रीय कार्यालय, महादेव शिंदे यांची ब क्षेत्रीय, कुंडलिक दरवडे यांची अ क्षेत्रीय आणि बाबासाहेब कांबळे यांची आरोग्य मुख्यालयात बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे अतिरिक्त आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे. अधिकाNयांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास तत्काळ कार्यमुक्त करावे. बदली दिलेल्या विभागात १२ जूलैपर्यंत रुजू होवून त्या अहवालाची प्रत प्रशासन विभागाकडे सादर करावी. आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसात कार्यभार हस्तांतर करुन तसा अहवाल विभाग प्रमुखांना द्यावा अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.