इंदापूरात एकाच कुटुंबातील नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ.

इंदापूर शहर ठरतंय कोरोना हाॅटस्पाॅट. इंदापूर : इंदापूर शहरात एकाच कुटुंबातील नऊ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून इंदापूर शहरातील कोरोना बाधितांची

इंदापूर शहर ठरतंय  कोरोना हाॅटस्पाॅट.

इंदापूर : इंदापूर शहरात एकाच कुटुंबातील नऊ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह  सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून  इंदापूर शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ही १२ झाली असल्याची माहिती  तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली आहे. तर इंदापूर शहराला कोरोना महामारीचा विळखा हळूहळू  घट्ट होतानाचे चित्र समोर येत आहे.  इंदापूर शहर तालुक्यात हाॅटस्पाॅट बनण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चेने शहरारातील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.तर नागरीकांनी कोणत्याही अफवा व चर्चांवर विश्वास ठेवू  नये. प्रत्येक नागरीकाने शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून स्वतःची व त्यांचे कुटुंबाची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले आहे.

इंदापूर तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची एकुण संख्या ही १७ पर्यंत पोहचली असुन त्यापैकी शिरसोडी व पोंदकुलवाडी येथील चार रूग्ण बरे होउन घरी परतले आहेत, तर भिगवण येथील ६८ वर्षीय महीला व इंदापूर येथील ७८ वर्षीय जेष्ठाचा कोरोना संसर्गाने मृृत्यु झाला आहे.तर नुसत्या इंदापूर शहरातील कोरोना बाधीतांची संख्या ही १२ वर पोहचली असुन त्यामध्ये  इंदापूर शहरातील जुनी रयतशाळा परीसरात कोरोना पाॅझीटीव्ह सापडलेल्या ३८ वर्षीय महिलेच्या कुटुंबातील नऊ जणांचा रीपोर्ट पाॅझीटीव्ह आल्याने शासनाच्या वतीने शहरात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

इंदापूर तालुका रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आल्याने इंदापूर शहरातील लाॅकडाउन शासनाच्या वतीने शिथील करण्यात आले होते.त्यामुळे तालुक्याच्या दळण वळणाची मुख्यबाजारपेठ असलेल्या इंदापूर शहरात तालुक्यातीच्या ग्रामीण भागातील नागरीकांची मोठी गर्दी होत असल्याने  मुख्य बाजारपेठेतील व्यापारी वर्गाकडून शासनाचे नियम पायदळी तुडवीले जात असुन सोशल डीस्टन्स नियमांचे कसलेही पालन होत नाही.परिणामी शहरात कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असतानाच शहरात एकाच कुटुंबातील नऊ जण कोरोना पाॅझीटीव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.तर सोशल डीस्टन्स नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांवर पोलीस प्रशासन व इंदापूर नगरपरिषदेकडून कसलीही कारवाई होत नसल्याने नागरीकातुन नाराजी व्यक्त होत आहे.

शनिवार दि.१३ रोजी इंदापूरातील जुणी रयत शाळा परिसरात एक महीला कोरोना पाॅझीटीव्ह सापडल्याने तीच्या संपर्कात आलेल्या ४० जणांना वैद्यकीय पथकाने ताब्यात घेवुन त्यांचे घशातील द्रव तपासणीसाठी पूणे येथील प्रयोग शाळेत पाठविले होते.व त्यांना इंदापूरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृृृहामध्ये आय सोलोशन कक्षात ठेवण्यात आले होते.सोमवारी रात्री उशीरा त्या सर्वांचे तपासणी रीपोर्ट आल्यानंतर ४० पैकी ९ जण पाॅझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याझाले असुन यामध्ये ४ महीला व ५ पुरूषांचा समावेश असल्याची माहीती तहसीदार सोनाली मेटकरी यांनी जाहीर केल्याने शहरातील नागरीकांच्या चींतेत भर पडली आहे.