व्यायाम शाळा सुरू करावी

फिटनेस क्लब असोसिएशनच्या वतीने आंदोलन पुणे: लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिने जीम बंद होत्या. यामुळे जीमचालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. लॉकडाऊनचा चौथा महिना सुरू होऊनदेखील कोणतीही परवानगी मिळाली

फिटनेस क्लब असोसिएशनच्या वतीने आंदोलन
पुणे:
लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिने जीम बंद होत्या. यामुळे जीमचालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. लॉकडाऊनचा चौथा महिना सुरू होऊनदेखील कोणतीही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. यासाठी आज पुणे फिटनेस क्लब असोसिएशनच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसेकर आणि महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्याकडे यापूर्वीदेखील परवानगी मागितली. परंतु, अद्याप कोणतीही सूचना मिळाली नाही. भाडे, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचे पगार आदी प्रश्‍न समोर आहेत. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा सवाल असोसिएशनने उपस्थित केला. तापमानाची तपासणी, सॅनिटायझरचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन करून जीम सुरू करू, असे निवेदन यापूर्वी दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही परवानगी मिळाली नाही, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष निलेश काळे यांनी दिली होती.