नाशिक फाटा – पिंपळे गुरव पुलापर्यंतच्या रस्त्यासाठी सात कोटीचा खर्च

नाशिक फाटा ते पवना नदीलगत शंकर मंदीर ते पिंपळे-गुरव पुलापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी ८ कोटी २४ लाख ३४ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने नाशिक फाटा ते पवना नदीलगत शंकर मंदीर ते पिंपळे-गुरव पुलापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटी रूपये खर्च होणार आहेत. नाशिक फाटा ते पवना नदीलगत शंकर मंदीर ते पिंपळे-गुरव पुलापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी ८ कोटी २४ लाख ३४ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून ८ कोटी १५ लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी ए. डी. एंटरप्रायजेस या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा १४.०१ टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच ७ कोटी ८८ हजार रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस ४ लाख ९५ हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी ९ लाख २७ हजार रूपये असे एवूâण ७ कोटी १५ लाख ११ हजार रूपये खर्च होणार आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या कामांची निविदा स्विकारण्यास २६फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे. एक वर्षात या हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार, या ठेकेदारासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.