यशवंतराव चव्हाण मेमोरील रूग्णालयाच्या स्वच्छतेवर दोन महिन्यात ८७ लाखांचा खर्च

वायसीएम रूग्णालय सध्या कोरोना साथीच्या उपचाराकरिता समर्पित करण्यात आले आहे. त्यामुळे या रूगणालयात कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच रूग्णालयात कोरोना संशयित रूग्ण आणि बाधीत रूग्णांची संख्याही जास्त आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन बीव्हीजी इंडीया यांना ऑगस्ट २०२० पासून प्रति महा ४२ लाख ४० हजार रूपये याप्रमाणे सहा महिन्यांकरिता २ कोटी ५४ लाख ४२ हजार रूपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

    पिंपरी: यशवंतराव चव्हाण मेमोरील रूग्णालयातील कॉरिडॉर, अंतर्गत व बाह्य परिसरातील रस्ते, पार्कींग, उद्यान साफसफाई आणि स्वच्छतेचे काम यांत्रिक पद्धतीने तसेच मनुष्यबळाद्वारे करणाऱ्या ठेकेदाराला दोन महिने मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी ८७ लाख ७४ हजार रूपये खर्च होणार आहे.

    महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील कॉरिडॉर, इनडोअर, शौचालय, स्वच्छतागृह आणि रूग्णालयाच्या बाह्य परिसरातील रस्ते, पार्कींग, उद्यान तसेच रूग्णालयातील डक्ट आणि ड्रेनेज लाईन साफसफाई आणि स्वच्छतेचे काम यांत्रिक पद्धतीने अत्याधुनिक उपकरणे, रसायने तसेच मनुष्यबळाद्वारे करण्यात येते. बीव्हीजी इंडीया यांनी सादर केलेल्या लघुत्तम दरानुसार १ ऑगस्ट २०१७ पासून प्रति महिना खर्च २२ लाख ६१ हजार रूपये याप्रमाणे त्यांच्यामार्पâत केले जात आहे. तीन वर्ष कालावधीकरिता किमान वेतन कायदा दराप्रमाणे मनुष्यबळाचे दर ग्राह्य धरून कोणतीही वाढ न देता साफसफाईचे काम देण्यात आले आहे. या कामाच्या आदेशाची मुदत जुलै २०२० रोजी संपुष्टात आली आहे.

    वायसीएम रूग्णालय सध्या कोरोना साथीच्या उपचाराकरिता समर्पित करण्यात आले आहे. त्यामुळे या रूगणालयात कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच रूग्णालयात कोरोना संशयित रूग्ण आणि बाधीत रूग्णांची संख्याही जास्त आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन बीव्हीजी इंडीया यांना ऑगस्ट २०२० पासून प्रति महा ४२ लाख ४० हजार रूपये याप्रमाणे सहा महिन्यांकरिता २ कोटी ५४ लाख ४२ हजार रूपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या कालावधीत नवीन निविदा कार्यवाही त्वरीत करून नवीन एजन्सी निश्चित करावी. या कामासाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार नाही याची खबरदारी घेण्याच्या अधिन राहून १२ ऑगस्ट २०२० रोजी स्थायी समिती सभेने मुदतवाढीस मान्यता दिली आहे. ही मुदत जानेवारी २०२१ रोजी संपुष्टात आली आहे.

    वायसीएम रूग्णालयातील कॉरिडॉर, अंतर्गत व बाह्य परिसरातील रस्ते, पार्कींग, उद्यान तसेच रूग्णालयातील डक्ट आणि ड्रेनेज लाईनची दैनंदीन साफसफाई आणि स्वच्छतेचे काम करण्यासाठी बीव्हीजी इंडीया यांना १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२१ या दोन महिन्याच्या कालावधीकरिता अथवा ई-निविदा कार्यवाही पुर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. पूर्वी झालेल्या करारनाम्यास अधिन राहून प्रति महिना ४३ लाख ८७ हजार रूपयाप्रमाणे दोन महिन्याकरिता ८७ लाख ७४ हजार रूपये खर्च होणार आहे.