शिक्रापूर ग्रामपंचायतच्या सौरदिव्यांचा खर्च पाण्यात

शिक्रापूर : शिरूर येथील ग्रामपंचायतच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावामध्ये अनेक ठिकाणी सौरदिवे बसविण्यात आले मात्र प्रत्येक ठिकाणी बसविण्यात आलेले सौरदिवे नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येत असून शिक्रापूर ग्रामपंचायतने बसविलेल्या सौर दिव्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात चालला असल्याचे दिसून येत आहे.

 तीन महिन्यात सौर दिवे जमीनदोस्त

शिक्रापूर : शिरूर येथील ग्रामपंचायतच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावामध्ये अनेक ठिकाणी सौरदिवे बसविण्यात आले मात्र प्रत्येक ठिकाणी बसविण्यात आलेले सौरदिवे नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येत असून शिक्रापूर ग्रामपंचायतने बसविलेल्या सौर दिव्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात चालला असल्याचे दिसून येत आहे.
          शिक्रापूर ता. शिरूर ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये मार्च २०२० मध्ये तब्बल सत्तावीस लाख रुपये किमतीचे दोनशेहून अधिक सौरदिवे बसविण्यात आले, परंतु सदर सौरदिवे बसवीत असताना अनियमितता असून ग्रामपंचायत सदस्यांच्या मर्जीप्रमाणे हे सौरदिवे बसविण्यात आले आहेत, मात्र सौरदिवे बसविल्यानंतर काही दिवसांमध्ये लगेचच सौरदिवे जमिनीवर पडले आहेत, काही दिवे बंदच राहिले, काही ठिकाणी दिवे चालूच झाले नाही, तर काही ठिकाणी दिवे चालू झाल्यानंतर मोबाईलच्या उजेडापेक्षा हि कमी प्रमाणात उजेड पडू लागला होता, काही ठिकाणी मोठ्या हायमेक्स दिव्या खाली आणि शेजारीच हे दिवे बसविले गेले याबाबत अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या परंतु त्यावर काहीही उपाययोजना केली गेली नाही, तर आता अनेक ठिकाणचे दिवे बंद झालेले असताना कित्येक ठिकाणचे दिवे जमिनीवर पडत आहेत त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असून ग्रामपंचायतच्या वतीने बसविण्यात आलेले सर्व दिवे तीन महिन्यातच बंद पडत असून नित्कृष्ट दर्जाचे काम झालेले असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन गप्प का सवाल नागरिकांना पडला आहे, तर गावामध्ये जमिनीवर पडलेले सौरदिवे माहिती सेवा समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणून जमा केले आहे.
 
सौरदिवे प्रकरणामध्ये मोठ्या भ्रष्टाचाराची शंका ……
शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये तब्बल सत्तावीस लाख रुपये खर्च करून सौरदिवे बसविण्यात आले, मात्र सर्व सौरदिवे अतिशय नित्कृष्ट दर्जाचे असून त्यांचा प्रकाश देखील पडत नाही आणि चार महिन्यामध्ये सर्व सौरदिवे बंद झाल्यामुळे सौरदिवे प्रकरणामध्ये मोठ्या भ्रष्टाचाराची शंका ग्रामस्थांना पडली आहे.   
 
 
सौरदिवे प्रकरणाबाबत मला काहीही माहिती नाही – बि. बि. गोरे ( ग्रामविकास अधिकारी )
शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात आलेले सौरदिवे हे मी येथे रुजू होण्यापूर्वी बसविण्यात आलेले आहे, त्यामुळे या सौरदिवे प्रकरणाबाबत मला काहीही माहिती नाही मात्र त्याबाबत योग्य ती चौकशी केली जाईल असे ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे यांनी सांगितले.