प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आरोपींकडून सहा मोबाईल, चारचाकी वाहन असा ३ लाख १७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी मंगेश पवार याच्यावर कामशेत, खोपोली व खालापूर पोलीस ठाण्यात तर रवींद्र धारपवार याच्यावर खोपोली व खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

    पिंपरी: पुणे – मुंबई द्रुतगती(Pune- Mumbai expressway ) मार्गावर चार दिवसांपूर्वी वाहन चालकांना मारहाण करून त्यांची लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी तळेगाव -दाभाडे पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्याकडून ३ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्से टोलनाक्याजवळ ही लुटमारीची घटना घडली होती.

    दिलीप गंगाराम जाधव (वय २४ ), मंगेश भाऊ पवार (वय २२), रवींद्र युवराज धारपवार (वय ३०), गणेश नारायण चौधरी (वय ३६, सर्व रा. खालापूर, जि. रायगड) अशी आरोपींची नावे आहेत. उर्से टोलनाक्याजवळ रस्त्याकडेला दोन ट्रकचालक ट्रक थांबवून झोपले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोकड व मोबाईल लुबाडून नेला. या गुन्ह्याच्या समांतर तपासासाठी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांची दोन पथके नियुक्त केली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक राम गोमारे, फौजदार राहुल कोळी, यांच्या पथकाने ही कारवाई केली.