केअर टेकारच्या नावाखाली वयोवृद्ध लोकांना लुटणाऱ्या सहाजणांच्या टोळीचा पर्दाफाश ; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    पुणे: शहरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढताना दिसत आहेत. गुन्हेगारीसाठी वेगवेगळे फंडे चोराकडून अवलंबाले जातात आहेत. नुकत्याच वयोवृद्ध दांपत्यांच्या घरात केअर टेकर, आचारी म्हणून राहण्याच्या बहाणे करत त्यांना लुटल्याच्या घटना उगडकीस आल्या आहेत. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी ६ लोकांच्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून गुन्हेगारांना अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील औंध परिसरात एका वयोवृद्ध जोडप्याला ३ अज्ञात चोरटयांनी केअर टेकरच्या नावाखाली फसवणूक करत बाथरूममध्ये कोंडून १५ लाख ८० हजारांचा ऐवज लुटला होता. त्यानंतर या पीडित दाम्पत्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांना पोलिसांनी या केअर टेकर टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली व त्यांचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे आरोपी वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात आचारी किंवा केअर टेकर म्हणून काम करायचे. काही दिवस काम केल्यानंतर ते वयोवृद्ध दाम्पत्याचा विश्वास संपादन करायचे. दरम्यान घरातील मौल्यवान गोष्टी कुठे आहेत, याचा तपास घेत असत. आणि एके दिवशी आपल्या साथीदारांच्या मदतीने घरात दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लुटत होते.

    पोलिसांनी औरंगाबाद, नाशिक, पैठण आणि जालना या भागातून सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबाद येथून संदीप हांडे (वय २५), किशोर चंघाटे (वय २१) आणि भोलेश उर्फ कृष्णा चव्हाण (वय २५) अशा तीन आरोपींना अटक केलं आहे. तर जालना येथून मंगेश गुंडे (वय २०) आणि राहुल बावणे (वय २२) आणि नाशिक येथून विक्रम थापा ऊर्फ बीके (वय १९) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाक्या, सोनं आणि हिऱ्याचे दागिने, आणि एक कॅमेरा जप्त केला आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत१७ लाख रुपये एवढी आहे.