voter list

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने जारी केली मतदारयादी

  पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे मतदार यादी १ जुलै दरम्यान प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर २० जुलै पर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. या कालावधीपर्यंत येणार्या हरकती आणि सूचनांबाबत बोर्डाच्या अध्यक्षांसमोर सुनावणी होईल. त्यानंतर १५ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

  पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मागील कार्यकारीणीची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर दोन वेळेला प्रत्येकी सहा-सहा महिन्यांची मूदतवाढ देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात बोर्ड प्रशासनातर्फे मतदार यादी अद्ययावती करणाचे काम हाती घेण्यात आले. या बाबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार म्हणाले की, एक जुलैला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर आता हरकती आणि सूचना मागविण्यात येत आहेत. १५ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  दरम्यान, बोर्ड बरखास्त झाले आहे.परंतू, अद्यापही लोकप्रतिनिधीची नियुक्ती तीन सदस्यीय मंडळात केलेली नाही. आगामी काळात बोर्डाच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर बोर्ड प्रशासनामार्फत मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे.

  -यादीतील मतदारसंख्या
  वॉर्ड १ – ४०३८
  वॉर्ड २ – ४१७३
  वॉर्ड ३ – ४६९६
  वॉर्ड ४ – ५९८५
  वॉर्ड ५ – ४९१५
  वॉर्ड ६ – ४६१६
  वॉर्ड ७ – ४२४६
  वॉर्ड ८ – ४६२०
  एकूण – ३७२८९