प्रसिद्ध नृत्यांगना विशाखा काळेची आत्महत्या, ‘या’ कारणामुळे उचलले टोकाचे पाऊल

पुण्यातील प्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना विशाखा काळे (Famous dancer Vishakha Kale) यांनी काल (बुधवार) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना विशाखा काळे (Famous dancer Vishakha Kale) यांनी काल (बुधवार) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामुळे (Accident) आलेले व्यंग आणि परिस्थितीला कंटाळून विशाखा काळे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी तिचे आई-वडील आणि बहीण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याच वेळेस विशाखाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाखा काळे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. तसेच तिचे वयवर्ष २२ होते.

एक वर्षापूर्वी विशाखाचा अपघात झाला होता. या अपघातामुळे तीच्या चेहऱ्यावर काही जखमा झाल्या होत्या. त्यामुळे मागील एक वर्षभरापासून विशाखा नैराश्यात होती. त्यात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे काही काम मिळत नव्हते. त्यामुळे नैराश्य वाढतच गेले आणि यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. असे विशाखाच्या बहिणीने सांगितले आहे.

विशाखा काळे यांनी गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा महाराष्ट्राची लोकधारा यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासह लावण्यांच्या कार्यक्रमातही काम केले होते.