प्रसिद्ध लेखक आनंद अंतरकर यांचे निधन

    पुणे : प्रसिद्ध लेखक आनंद अंतरकर (Anand Antarkar) यांचे, शनिवार (दि.२८) रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.

    साधारण महिनाभरापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या . त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. रुग्णशय्येवरूनही ते शेवटच्या क्षणापर्यंत दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते. त्यांच्या पश्चात् त्यांची पत्नी प्रियदर्शिनी (ग. दि. माडगूळकर यांची कन्या), पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत.

    सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर ह्या त्यांच्या भगिनी आहेत. रूग्णालयात जाण्यापूर्वी आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बव्हंशी पूर्ण केले होते. ७५ वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे ह्या वर्षीचे दिवाळी अंकसुद्धा वाचकांपर्यंत पोहचणार आहेत, अशी ग्वाही अभिराम अंतरकर ह्यांनी दिली.