Far from raising salaries, cuts in nurses' salaries; The staff nurse is now in the sanctity of the movement

कोरोनाच्या भीषण काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हजारो रुग्णांची सेवा करुन जीव वाचविण्यात मदत करणाऱ्या परिचारिकांना कोरोना योध्दा म्हणून संबोधले जाते. परंतु या कोरोनायोद्ध्यांवर सध्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कोरोनाकाळात परिचारिकांना कायमस्वरुपी करुन घेणार, पगारवाढ देणार अशा अनेक घोषणा करण्यात आल्या.परंतु या आश्वासनांची पूर्तता तर दूरच या परिचारिकांच्या मानधनातही कपात करण्यात आली.यामुळे पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच) रुग्णालयामध्ये गेल्या १२ वर्षापासून मानधनावर कार्यरत असणाऱ्या स्टाफ नर्स आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

    पिंपरी :कोरोनाच्या भीषण काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हजारो रुग्णांची सेवा करुन जीव वाचविण्यात मदत करणाऱ्या परिचारिकांना कोरोना योध्दा म्हणून संबोधले जाते. परंतु या कोरोनायोद्ध्यांवर सध्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कोरोनाकाळात परिचारिकांना कायमस्वरुपी करुन घेणार, पगारवाढ देणार अशा अनेक घोषणा करण्यात आल्या.परंतु या आश्वासनांची पूर्तता तर दूरच या परिचारिकांच्या मानधनातही कपात करण्यात आली.यामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच) रुग्णालयामध्ये गेल्या १२ वर्षापासून मानधनावर कार्यरत असणाऱ्या स्टाफ नर्स आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

    कोरोनाकाळात महापालिकेने ऑगस्ट २०२० मध्ये या स्टाफ नर्संना कायमस्वरुपी सामावून घेण्याचा ठाराव केला.मात्र, अद्याप त्यांना मानधनावर ठेवण्यात आले आहे.उलट कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये काम केले असतानाही त्यांच्या मानधनात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गेली १२ वर्ष प्रामाणिकपणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या परिचारिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

    पिंपरीतील वायसीएम रुग्णालयामध्ये कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यात आले .वायसीएम रुग्णालय हे महापालिकेचे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.या ठिकाणी ७०० खाटांची क्षमता आहे.कोरोनाच्या काळात रुग्णालयावर मोठा ताण होता. या काळात येथील कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली.या ठिकाणी गेल्या १२ वर्षांपासून परिचारिका मानधनावर कार्यरत आहेत.त्यांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय सुविधा आणि इतर आर्थिक लाभ दिले जात नाहीत.या परिचारिकांना महापालिकेच्या कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी महापालिकेने महासभेमध्ये ठराव केले.त्याला महापौर उषा ढोरे यांनी मान्यता दिली.मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप त्यांना महापालिका सेवेते सामावून घेण्यात आले नाही.

    कोरोनामध्ये या परिचारिकांनी रात्र – दिवस रुग्णांची सेवा केलेली असतानाही त्यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.या काळात त्यांच्या मानधनात वाढ न करता उलट २ हजार रुपये कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.फेब्रुवारी २०२१ पासून परिचारिकांच्या मानधनात कपात करण्यात आली आहे.त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.येत्या १५ जूनला परिचारिका आंदोलन करणार आहे.तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून काळया फिती लावून निदर्शने करणार आहेत.

    हे सुद्धा वाचा