कृषिकन्या अमृता शेगडे हिने शेतकऱ्यांना दिली शेती विषयक प्रात्यक्षिके

कर्जत : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय अंबाजोगाई ची विद्यार्थिनी कु. अमृता तात्यासाहेब शेगडे हिने कर्जत तालुक्यातील शेगुड येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रीय पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती व प्रात्यक्षिके दिली

या कार्यक्रमांतर्गत तिने निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत सांगितली ती खालील प्रमाणे –
०५ किलो निंबोळी चुरा, ०९ लिटर पाण्यात भिजत टाकावा , तसेच ०१ लिटर पाण्यात 200 ग्राम साबणाचा चुरा वेगळा भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी निंबोळी अर्क चांगला गाळून घ्यावा. या अर्कात ०१ लिटर पाण्यात तयार केले साबणाचे द्रावण मिसळावे, व हा सर्व अर्क दहा लीटर होईल एवढे पाणी टाकावे, अशाप्रकारे १ लिटर अर्क  ९ लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरावा . अशी सविस्तर माहिती तिने या प्रात्यक्षिकामार्फत शेतकऱ्यांना दिली.

तसेच चारा प्रकिया, जनावरांची काळजी, एकात्मिक कीड व्यवस्थापन , रोग व्यवस्थापन , माती परीक्षण ,मार्केटिंग, सेंद्रिय घटकांचा पुनर्वापर मोबाईल व मोबाईल ॲप्स चा वापर, एकात्मिक तण व्यवस्थापन , जीवामृत तयार करण्याची पद्धती , अशा प्रकारच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करून त्याबद्दल तिने सविस्तर माहिती दिली

या प्रात्यक्षिकांत कृषी अधिकारी श्री शाम अडसुळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप शेगडे, माजी सरपंच काशिनाथ शेगडे, प्रदीप सोनवणे , तात्यासाहेब शेगडे व इतर शेतकरी उपस्थित होते अमृता हिला कृषि महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व कार्यक्रमाधिकारी डॉ. व्ही .व्ही.तायडे, डॉ. वाई एम. वाघमारे, डॉ. एन.एस कांबळे , डॉ पि.नारवंडीकर, डॉ. एस.एस.गलांडे , डॉ.एस. एस. जाधव, ई. यांचे मार्गदर्शन लाभले