योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी देताहेत पीक फेकून; शरद पवारांची खंत

  जुन्नर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी देशात सध्या शेतक-यांच्या पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी पीक फेकून देत असल्याची खंत व्यक्त केली आहे. सहकार महर्षी माजी आमदार शिवाजीराव तथा दादासाहेब काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज पवार यांच्या उपस्थितीत  अनावरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री आणि आंबेगाव जुन्नर मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

  शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

  यावेळी बोलताना पवार म्हणाले की, सध्या देशात पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. माझ्याकडे केंद्रात कृषी खाते असताना शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव देत होतो असेही शरद पवारांनी म्हणाले. ते म्हणाले की, सध्या मात्र लक्ष दिले जात नसल्याने तोडणीचा खर्चही निघत नसल्याने शेतक-यांना पीक फेकून देण्याची वेळ येत आहे.

  सध्याचे केंद्र सरकार लक्ष देत नाही

  ते म्हणाले की, शेतकरी कष्ट करतो आणि देशाची भूक भागवतो, सा-या देशाला जगाला अन्नधान्य पुरविण्याची कामगिरी करणा-या शेतक-यांना मात्र सध्याचे केंद्र सरकार गरज आहे तितके लक्ष देत नसल्याची खंत आहे असे पवार यांनी बोलून दाखवले. ते म्हणाले की त्यामुळे शेतक-यांना हमी भावा इतकाही दाम मिळत नसून सात त्याने शेतमालाच्या किमती घसरताना दिसत आहेत असे पवार म्हणाले.

  उपस्थितांच्या मोठ्या गर्दीबाबत चिंता

  दरम्यान, या कार्यक्रमाला ब-याच दिवसांपासून वेळ मिळत नव्हता कोरोना मुळे गर्दी टाळण्यासाठी हा कार्यक्रम लांबणीवर पडल्याचे ते म्हणाले, यावेळी उपस्थितांच्या मोठ्या गर्दीबाबतही त्यानी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की सात त्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून गर्दी टाळण्याचा सल्ला दिला जात आहे, अनावश्यक गर्दी टाळायला हवी, अजूनही पुणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागात कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आले नाही याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.