उजनीच्या पाणी प्रश्नावरून शेतकऱ्यांचे बारामतीत आंदोलन ..?, आंदोलना पूर्वीच दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात ; शरद पवारांच्या  गोविंदबाग निवासस्थानासमोर बंदोबस्त वाढवला

इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव रद्द केल्या बाबतचा अध्यादेश शासनाने जाहीर करावा, या मागणीसाठी आज स्वर्गीय यशवंतराव उजनी पाणी बचाव संघर्ष समिती यांच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घराबाहेर खर्डा भाकरी आंदोलन करणार होते.

    माळेगाव: उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णयामुळे आक्रमक झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलेय. आज या आंदोलकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या गोविंद निवासस्थानासमोर येत आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. यावेळी खर्डा भाकर आंदोलन करण्यासाठी पंचवीस ते तीस कार्यकर्ते येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, यातील दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन जणांना ताब्यात घेतले असले तरी आणखी ३५ जण या आंदोलनासाठी बारामतीत दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवास स्थानासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आलाय.
    सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या पाणी प्रश्नावरून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात देखील उजणीचे पाच टीएमसी पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केले आहेत. २२ एप्रिल रोजी उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला देणेबाबत योजना राबविण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याला सोलापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. मात्र त्याबाबत कोणताही लेखी अध्यादेश काढला नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यातील शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते संभ्रमात आहेत.

    इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव रद्द केल्या बाबतचा अध्यादेश शासनाने जाहीर करावा, या मागणीसाठी आज स्वर्गीय यशवंतराव उजनी पाणी बचाव संघर्ष समिती यांच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घराबाहेर खर्डा भाकरी आंदोलन करणार होते. एकूण २५ जण आंदोलन करणार होते. पण त्यातील २३ जणांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं घेतलं. परंतु २ आंदोलक शरद पवारांच्या घराबाहेर हे पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. नागेश वनकळसे आणि महेश पवार अशी आंदोलकांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं. हे आंदोलक मोहोळ तालुक्यातील आहेत. महेश पवार हे राष्ट्रवादीचे कार्यकते आहेत तर नागेश वनकळसे हे शिवसेनेचे कार्यकते आहेत.

    याबाबत ‘नवराष्ट्र’ने या आंदोलनकर्त्यांची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न केला असता वनकळसे म्हणाले, उजनी धरणातील पाण्यावर आमचा हक्क असताना देखील सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूर तालुक्याला ह्यात पाणी पळविण्याचा घाट सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी घातला आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. पालक मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्यावर अजिबात विश्वास नाही. पालकमंत्री हा सोलापूर जिल्ह्याचा विश्वस्त आहे. खरे तर पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच हीत बघायचं असतं, पण सोलापूर जिल्ह्याच हित बघायचे सोडून इंदापूरला पाच टीएमसी पाणी त्याच्या नेतृत्वामध्ये नेले जाते हे कुठेतरी विश्वासार्हतेला तडा जाणार आहे. या अगोदर असा प्रकार कधी झालेला नाही.

    जो तळे राखी तो पाणी पिणारा पण अख्ख तळच पळविण्याचा प्रकार होत आहे. या सर्व प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे एकमेव आम्हाला न्याय देतील असा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही गोविंद बागे समोर येऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.