वांगी पिकाची बांधणी करण्यात शेतकरी व्यस्त

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील पोंदेवाडी, काठापुर, लाखणगांव, देवगांव परिसरातील शेतकरी वांग्याची बांधणी मजुरांच्या सहाय्याने करत आहेत. वांग्याला प्रतवारीनुसार दहा किलोसाठी २२०

मंचर  : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील पोंदेवाडी, काठापुर, लाखणगांव, देवगांव परिसरातील  शेतकरी वांग्याची बांधणी मजुरांच्या सहाय्याने करत आहेत. वांग्याला प्रतवारीनुसार दहा किलोसाठी २२० ते २५० रुपये बाजारभाव मिळत आहे.
आंबेगाव तालुक्यात अनेक तरकारी पिके, भाजीपाला, फळे यांचे उत्पादन घेतले जाते. येथे उत्पादित होणारा माल पुणे आणि मुंबई या ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जातो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पिके घेण्याऐवजी शेती पडून ठेवली होती.मात्र या कार्यकाळात काही शेतकऱ्यांनी तरकारी पिके घेतली.शेतकऱ्यांची काही तरकारी पिके काढणीला व तोडणीला आली असून  मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत  आहे. लॉकडाउनच्या कार्यकालात लागवड केलेल्या वांगा पिकाची बांधणी मजुरांच्या सहाय्याने शेतकरी करत आहे. बाजारभाव चांगला असल्याने शेतकरी वांग्यांच्या बागेला जपत आहे.