रिंगरोडला पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांचा विरोध; बाधित जमिनीचा दर जाहीर करावा

  वाघोली : एमएसआरडीसीच्या पुणे पूर्व भागातील रिंगरोडला पूर्व हवेलीतील वाडेबोल्हाई, सिरसवडी, गावडेवाडी, बिवरी, कोरेगाव मूळ, प्रयागधाम, वळती, डोंगरगाव, बकोरी, पेरणे, लोणीकंद, भावडी, तुळापुर या गावांतील रिंगरोडमध्ये जमिनी जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी जाहीर विरोध दर्शविला आहे. यामध्ये जाणाऱ्या जमिनींचा लेखी स्वरूपात दर त्वरित जाहीर करावा.

  जमिनीची सद्यपरिस्थितीची पाहणी करून योग्य तो एक रकमी दर देण्यात यावा. स्थानिक परिसराचा विकास होण्यासाठी रिंगरोडच्या दोन्ही बाजुंनी १० मीटर रुंदीचा सर्व्हिस रस्ते बांधून द्यावेत. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या जमिनींविषयी शासनाने योग्य तो निर्णय घेऊनच निर्णय घेण्यात यावे. ज्या गावामध्ये रिंगरोडचे जमिनीची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांवर महसूल प्रशासनाकडून दबाव आणला जातो. तो दबाव शासनाने शेतकऱ्यांवर टाकू नये. पूर्व हवेलीतील गावे पीएमआरडीएच्या हद्दीत येत  असल्याने बाधित शेतकऱ्यांना पाचपट मोबदला दर मिळावा. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमच्या भागातील जाणारा रिंगरोड रद्द करावा, अशा मागण्या बाधित शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

  श्री क्षेत्र वाडेबोल्हाई (ता.हवेली) येथे शासकीय अधिकारी व रिंगरोड बाधित शेतकरी,ग्रामस्थ यांची बैठक बोल्हाई माता कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी पार पडलेल्या बैठकीत रिंगरोडला विरोध दर्शवित बाधित शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे निवेदन पत्र उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिले. या रिंगरोडबाबत बैठकीत बाधित शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांविषयी आपली बाजू मांडून मते व्यक्त केली. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांनी दिली.

  याप्रसंगी हवेलीचे उपविभागीय प्रांत अधिकारी सचिन बारवकर, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते, पूर्व हवेलीचे तहसीलदार चोबे, वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, एमएसआरडीसी बांधकाम खात्याचे अभियंता संदिप पाटील, वाडेबोल्हाईचे तलाठी सचिन मोरे, पेरणेचे तलाठी अशोक शिंदे, पिंपरी सांडस चे तलाठी पवनकुमार शिवले,वाडेबोल्हाईचे माजी सरपंच कुशाभाऊ गावडे,माजी उपसरपंच राजेश वारघडे,जोगेश्वरी विद्यालयाचे शिक्षण समितीचे अध्यक्ष विद्याधर गावडे,जि.प.चे माजी सदस्य डॉ.चंद्रकांत कोलते,पीडिसीसी बँकेचे संचालक माणिकराव गोते,पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप,वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे,सिरसवडीच्या सरपंच सीमा नामदेव गावडे,ग्रा.पं.सदस्य अमित गोते,बिवरीच्या सरपंच कविता जालिंदर गोते,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे,पंचायत समितीचे सदस्य शामराव गावडे,अ.भा.माहिती सेवा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल गावडे,केसनंदचे माजी उपसरपंच संतोष हरगुडे,मंगेश गावडे,विकास गायकवाड,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विजय पायगुडे,सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे,माऊली ढवळे,बळीराम गावडे,धर्मेंद्र गावडे,संजय चव्हाण,पंडित कोलते,मानसिंग गावडे,महेंद्र झेंडे,प्रभाकर कामठे,काळूराम गोते आदी पूर्व हवेलीतील बाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

  या बैठकीत बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने लोकप्रतिनिधी म्हणून वाडेबोल्हाईचे माजी सरपंच कुशा गावडे, पंचायत समितीचे सदस्य शामराव गावडे,जि.प.चे माजी सदस्य डॉ.चंद्रकांत कोलते,केसनंदचे माजी उपसरपंच संतोष हरगुडे यांनी मत व्यक्त करून मार्गदर्शन केले.

  मोजणीचे टप्प सर्व शेतकऱ्यांना सांगितले

  जे कायद्यात आहे त्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांनी नक्कीच मागणी केली पाहिजे. मोजणीचे टप्पे सर्व शेतकऱ्यांना सांगितले आहे. मंडलाधिकाऱ्यांना लेखी देण्याचे अधिकार नाहीत. याबाबत माझ्याकडून काय लेखी पाहिजे ती लेखी देण्याचे काम करू नक्कीच. त्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये यावे.

  – सचिन बारवकर, प्रांताधिकारी, हवेली.

  रिंगरोडबाबत शासकीय नियमांप्रमाणे योग्य ते होईल

  आम्ही पण शेतकरीच आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी आम्ही पण समजू शकतो. जेवढे काय आमच्या हातात आहे. तेवढे आम्ही तर करणारच आहोत. इतरत्र रिंगरोडबाबत शासकीय नियमांप्रमाणे योग्य ते होईल.

  – तृप्ती कोलते, तहसीलदार, हवेली तालुका