कवठे येमाईत शेतकऱ्यांना मिळणार केंद्राच्या ३ % व्याज सवलतीचा फायदा – डॉ.पोकळे यांच्या पाठपुराव्यास यश

कवठे येमाई : देशभरात कहर माजवित असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना मागील वर्षी घेतलेले पीक कर्ज भरण्यासाठी ३१ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत मागील वर्षी देण्यात आलेल्या ऊस पीक कर्जावर मुदतीत कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून केंद्र शासनाच्या ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ दिला जात नव्हता.

 कवठे येमाई : देशभरात कहर माजवित असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व  शेतकऱ्यांना मागील वर्षी घेतलेले पीक कर्ज भरण्यासाठी ३१ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत मागील वर्षी देण्यात आलेल्या ऊस पीक कर्जावर मुदतीत कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून केंद्र शासनाच्या ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ दिला जात नव्हता. मुदतबाह्य व्याजाबरोबर पूर्ण वर्षाचे व्याज भरून घेतले जात होते.  शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बाब चुकीची होत असल्याचे निदर्शनास आल्याने शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे व सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुंडलिक शितोळे यांनी या संदर्भात थेट बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात व बँकेचे कार्यकारी संचालक यांच्या निदर्शनास आणून या बाबतीत सातत्याने पाठपुरावा केल्याने कवठे येमाई परिसरातील अनेक  शेतकऱ्यांना केंद्राच्या ३ टक्के सवलतीचा फायदा होणार आहे. तसेच ज्या  शेतकऱ्यांनी व्याज भरले आहे त्या शेतकऱयांना ३६५ दिवसांचे व्याज आगामी दोन दिवसात त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची व ३६५ दिवसांपुढील व्याज कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून तेव्हढ्याच दिवसांचे व्याज आकारण्यात येणार असल्याची माहीती बँकेचे विकास अधिकारी नाथा खर्डे यांनी दिली.तर कवठे येमाई परिसरातील सुमारे १३० शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.  

        ज्या पद्धतीने कवठे येमाई परिसरातील शेतक-यांना  जिल्हा बँक पीक कर्जाचे घेतलेले व्याज परत देणार आहे त्याच पद्धतीने तालुक्यातील इतर ही सोसायटयांनी शेतकऱयांचे वसूल केलेले व्याज तात्काळ शेतकऱयांना परत करण्याची मागणी ही डॉ.सुभाष पोकळे यांनी केली आहे. तसेच सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात शेतकऱयांना दिलासा देणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष  अध्यक्ष रमेश थोरात यांचे विशेष आभार डॉ.सुभाष पोकळे व परिसरातील शेतकऱ्यांनी मानले आहेत.