चक्रीवादळामुळे ऊसाचे पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

मंचर : निसर्ग चक्रीवादळाचा मोठ्याप्रमाणावर तडाखा आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील ऊस पिकाला बसला असून आठ ते नऊ महिने वयाचे उसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. ऊस जमीनीवर लोळत असल्याने उत्पादन घट होणार

मंचर : निसर्ग चक्रीवादळाचा मोठ्याप्रमाणावर तडाखा आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील ऊस पिकाला बसला असून आठ ते नऊ महिने वयाचे उसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. ऊस जमीनीवर लोळत असल्याने उत्पादन घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होण्यासाठी अजुन पाच महिने कारखाना सुरु होण्याची वाट शेतकऱ्यांना पहावी लागणार आहे. निसर्ग चक्रीवादळात ऊस,तरकारी पिके,जनावरांचा चारा यांचे मोठे नुकसान झाले. तसेच घर,गोठे,निवारा शेड,कांदाचाळी यांचेही नुकसान झाले आहे. सर्वात जास्त फटका ऊस पिकाला बसला आहे. या ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.

येथील शेतकऱ्यांचे ऊस हे मुख्य पीक असून ज्या शेतकऱ्यांनी मागील जुलै-ऑगस्टमध्ये उसाची लागवड केली होती. असा आठ ते दहा महिने वयाचा ऊस निसर्ग चक्रीवादळाने भुईसपाट झाला आहे. काही ठिकाणी उस उन्मळुन पडला आहे. अजूनही ऊस कारखाने सुरु होण्यासाठी चार महिन्याचा अवकाश आहे.त्यामुळे चार महिन्यापर्यंत उसाची तोडणी होणार नाही.परिणामी ऊस भुईसपाट झाल्याने शेतकè्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.उससपाट झाल्याने वाढीवरही परिणाम होणार आहे. तसेच उत्पादनातही घट होणार आहे. ऊसाला पाणी देणे,खते देणे हेही अडथळ्याचे ठरणार आहे. इतर तरकारी पिकांची बाजारभावाची असलेली डोलायमान स्थिती त्यापेक्षा उसाचे उत्पादन हमखास मिळते. शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. प्रत्येक शेतकरी कमी जास्त प्रमाणावर ऊस पिक घेतो.म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.