शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी

वाघोली : पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी हवेली तालुका भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे हवेली तहसीलदार यांचेकडे करण्यात आली.

 हवेली तालुका भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मागणी

वाघोली : पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी हवेली तालुका भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे हवेली तहसीलदार यांचेकडे करण्यात आली.
-अवकाळी पावसामुळे बळीराजा खचला
मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने पुणे जिल्ह्यात पावसासह सुसाट वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच कोरोनामुळे हातघाईस आलेला बळीराजा अवकाळी पावसामुळे खचला असून आर्थिक संकटात सापडला आहे. पुणे जिल्ह्यात व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांचे पॉलिहाउसचे मोठे नुकसान झाले. बँकेकडून घेतले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत बळी राजा अडकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकचे हप्ते पुढील दोन वर्षा करिता थांबवावेत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. खरीप हंगाम सुरु झाला असून पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरण्या वाया जातील असे चिन्ह दिसून येत आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले असताना निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे पूर्णतः खचला असल्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे हवेली तालुका भाजपच्या वतीने हवेली तहसीलदार यांना करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष सुनिल कांचन, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बापू कुटे, सुदर्शन चौधरी, चित्तरंजन गायकवाड जयप्रकाश सातव व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकरी कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात अडकला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पॉलिहाउस उभारले परंतु वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. संबधित विभागाने तात्काळ पंचनामे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी व बँकेचे हप्ते पुढील दोन वर्षांसाठी थांबवावे.
– गणेश बापू कुटे (भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष)