शेतकऱ्यांनी बाजार आवारात शेतमाल विक्रीस आणावा ; बाजार समितीचे  आवाहन

पुणे : शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात शेतमाल िवक्रीसाठी घेऊन येताना काेणत्याही अाेळखपत्राची आवश्यकता नाही असा खुलासा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने केला अाहे. शेतकऱ्यांनी बाजार

पुणे : शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात शेतमाल िवक्रीसाठी घेऊन येताना काेणत्याही अाेळखपत्राची आवश्यकता नाही असा खुलासा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने केला अाहे. शेतकऱ्यांनी बाजार अावारात शेतमाल विक्रीस आणावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

काेराेनामुळे बंद ठेवण्यात अालेला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाजीपाला, कांदा – बटाटा, फळे बाजार पुन्हा सुरू झाला असला तरी बाजारातील अावक मर्यादीत राहीली अाहे. ग्राहक नसल्याने शेतमाल विक्रीवर परीणाम हाेऊ लागला अाहे. बाजार अावाराच्या परीसरात काही शेतकरी येऊन ते थेट िकरकाेळ विक्रेत्यांना शेतमालाची विक्री करीत अाहेत. याप्रकरणी बाजार समितीने रस्त्यावर भरविण्यात येणाऱ्या अनधिकृत विक्रीवर मर्यादा अाणावी अशी मागणी पुणे महापािलकेकडे केली हाेती.

बाजार अावारात काेराेनाचा प्रसार हाेऊ नये म्हणून हा  बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी बाजार समितीच्या प्रशासनाने काही नियम तयार केले अाहे. या नियमांचा चुकीचा अर्थ लावून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा दावा बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी केला अाहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अावारात शेतकऱ्यांना शेतमाल िवक्रीस अाणताना काेणत्याही अाेळखपत्राची गरज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीला अाणावा अशी असे अावाहन देशमुख यांनी केले अाहे.

बाजार समितीच्या मुख्य अावारासह उत्तमनगर, माेशी अािण मंाजरी येथील बाजारात नियमितपणे अावक हाेत असुन, मार्केट यार्ड येथील बाजारातही शेतकऱ्यांनी शेतमाल वि्ाक्रीला अाणावा, काेणतीही तक्रार असेल तर बाजार समितीकडे कळवावी असेही त्यांनी नमूद केले अाहे.