शेतकऱ्यांंना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी

भिमाशंकर : शेतकऱ्यांंसाठी पीककर्ज उपलब्ध करावे व शासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकरी कर्जमाफी करावी. तसेच अवकाळी व चक्रीवादळामुळे झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, या मागणीचे निवेदन भाजपच्यावतीने आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तहसिलदार यांना देण्यात आले.

 आंबेगाव तालुका भाजपच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे केली मागणी                                                                                                                                                                                                                                                                                                                    

भिमाशंकर :  शेतकऱ्यांंसाठी पीककर्ज उपलब्ध करावे व शासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकरी कर्जमाफी करावी. तसेच अवकाळी व चक्रीवादळामुळे झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, या मागणीचे निवेदन भाजपच्यावतीने आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तहसिलदार यांना देण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे जयशिंग एरंडे, कैलास राजगुरव,  अशोक भोर, उत्तम राक्षे, दिपक घोडेकर, नवनाथ थोरात आदि पदाधिकारी उपस्थित होते.  
-कर्ज माफीची अंमलबजावणी पूर्ण करावी
आंबेगाव तालुका भाजपच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांंकडे दोन वेळच्या जेवणाचे सुध्दा पैसे नाहीत आणि कर्ज घेतल्याशिवाय पेरणी करू शकत नाही. राज्य सरकारच्या बांधावर खत व बियाणे या योजनेचा बोजवारा उडालेला आहे. यासाठी शेतकऱ्यांंना पीककर्ज देण्याची व्यवस्था करावी व कर्ज माफीची अंमलबजावणी पूर्ण करावी. राज्यात अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. मजबुरीने तो कमी भावात विकावा लागत आहे. चणा खराब होण्याची वेळ आली असुन शासनाकडून खरेदी होत नाही. कापसाचे, तुरीचे, चण्याचे पैसे आलेले नाही. बियाणे, खते व मजुरी भागवायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांंपुढे निर्माण झाला आहे.  
दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना ओटीएस व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांंना प्रोत्साहनपर ५० हजार रूपये देण्याचे शासनाने जाहिर केल्याप्रमाणे त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. अवकाळी पावसामुळे चक्रीवादळामुळे पुणे जिल्हयाच्या मावळ, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्वसामान्य व शेतकऱ्यांंना तातडीने मदत करण्याची मागणी, आंबेगाव तालुका भाजपाच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.