दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे

शासकीय योजनांच्या माध्यमातून स्वतःचा फायदा करुन घेण्यासाठी शासनाच्या नवनव्या योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केले.

  इंदापूर : शासकीय योजनांच्या माध्यमातून स्वतःचा फायदा करुन घेण्यासाठी शासनाच्या नवनव्या योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी शनिवारी (दि.२९) येथे  केले.

  २०२० च्या रब्बी हंगामात घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत पुरस्कार मिळवणारे शेतकरी, विस्तार कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

  शासनाचा कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  शेतकऱ्यांसाठी एक कोटींचा निधी दिला

  मंत्री भरणे म्हणाले, प्रयोगशील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा तालुका म्हणून राज्यात इंदापूर तालुक्याचे स्थान अव्वल क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करणारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा संच आहे, याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण एक कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. पीक स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय, तर सहा शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय पुरस्कार मिळवले आहेत, ही प्रेरणादायी बाब आहे.

  प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब रुपनवर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश सूर्यवंशी यांनी केले. आबासाहेब रुपनवर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब कोकणे, सतीश महानवर, विक्रम वाघमोडे यांनी परीश्रम घेतले.