महाशिवरात्री पर्वामुळे उपवासाचा साबुदाणा अन् शेंगदाणे झाले महाग

या वर्षी महाशिवरात्रीनिमित्त साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात वाढ झाली असून साबुदाणा ५ रुपये तर शेंगदाणा १० रुपयांनी वाढला आहे. परंतु भगर आणि नायलॉन साबुदाण्याच्या दरात वाढ झालेली नाही. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. इतर उत्पादनांचे व्यापारीही संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या पर्वावर पिंपरी - चिंचवड आणि ग्रामीण भागातील उपवासाच्या वस्तूंची मागणी कमी झाली आहे.

    पिंपरी: भगवान शंकराच्या महाशिवरात्रीच्या पर्वावर अनेक जण उपवास करतात. त्यामुळे या व्रतासाठी साबुदाणा आणि शेंगदाण्याची मागणी वाढते. परंतु ११ मार्च रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी शहरातील ठोक किराणा बाजारात साबुदाणा, शेंगदाणे, भगर, नायलॉन साबुदाणा महाग झाला आहे. त्यामुळे या वस्तूंची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत खूप कमी झाली आहे. उपवासासाठी मागणी होत असलेल्या या वस्तूंची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली आहे.

    या वर्षी महाशिवरात्रीनिमित्त साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात वाढ झाली असून साबुदाणा ५ रुपये तर शेंगदाणा १० रुपयांनी वाढला आहे. परंतु भगर आणि नायलॉन साबुदाण्याच्या दरात वाढ झालेली नाही. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. इतर उत्पादनांचे व्यापारीही संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या पर्वावर पिंपरी – चिंचवड आणि ग्रामीण भागातील उपवासाच्या वस्तूंची मागणी कमी झाली आहे. ठोक दरात काही दिवसांपूर्वी ४५ रुपयांत विकला जाणारा साबुदाणा आता ५ रुपये वाढ झाल्यामुळे ४९ रुपये किलो झाला आहे. यामुळे किरकोळ दर क्वालिटीनुसार ५० रुपयांवरून ५४ ते ५५ रुपये करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शेंगदाणा पूर्वी ठोक दरात ७० ते ९० रुपये प्रति किलो विकण्यात येत होता. आता १० रुपये वाढल्यामुळे हा दर ८० ते १०० रुपये झाला आहे. किरकोळ दर ८० ते १०५ रुपयांवरून ९० ते ११० रुपये झाले आहेत. भगरचा भाव आताही ८८ रुपये प्रतिकिलो आहे. भगर किरकोळ दरात ९० ते ९५ रुपये किलो विकण्यात येत आहे. तसेच नायलॉन साबुदाणा ५८ रुपये किलो असून किरकोळ दर ६८ रुपये आहे.