भीषण अपघात : ट्रक – दुचाकी धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रकचालक शिक्रापूर - चाकण रस्त्याने भरधाव वेगात जात होता. त्यावेळी दुचाकीस्वार विष्णू शेळके हे चाकण - शिक्रापूर मार्गावरून जात होते. खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे आल्यानंतर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार विष्णू याचा जागीच मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

    पिंपरी:  शिक्रापूर – चाकण रस्त्यावर शनिवारी रात्री ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

    विष्णू भगवानराव शेळके (वय २४, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत गजानन उल्हास मोहिते (वय २३, रा. वाशिम) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एम. एच. ०४ / एफ. ५५२८) चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रकचालक शिक्रापूर – चाकण रस्त्याने भरधाव वेगात जात होता. त्यावेळी दुचाकीस्वार विष्णू शेळके हे चाकण – शिक्रापूर मार्गावरून जात होते. खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे आल्यानंतर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार विष्णू याचा जागीच मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.