आंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भिती

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात निरगुडसर, जवळे व शिनोली या तिन गावांत एकाच दिवशी कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली असुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीनही व्यक्ति मुंबई

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात निरगुडसर, जवळे व शिनोली या तिन गावांत एकाच दिवशी कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली असुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीनही व्यक्ति मुंबई येथून गावाला आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. 

तालुक्यात मुंबईहुन तीनही पुरूष चार दिवसांपूर्वी गावाला आले. यामध्ये शिनोली येथील व्यक्तिचे वय ३१, निरगुडसर व्यक्तिचे वय ६३ व जवळे येथील व्यक्तिचे वय ६० आहे. या व्यक्तिंना त्रास होत असल्याने त्यांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नेण्यात आले. अन् दि. २४ रोजी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. प्रशासनाने रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याबरोबर निरगुडसर व जवळे गाव सिल बंद केले. तर शिनोली येथे दि. २२ रोजी पॉझिटीव्ह रूग्ण आढळला होता त्यामुळे तो पहिलेच गाव सिल बंद केलेले होते. 

मुंबईहून गावाला आलेल्या या व्यक्ति अनेकांना भेटले असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केल्याने यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्याचे काम प्रशासनाच्या वतीने चालू आहे. याअगोदर दि. १९ रोजी साकोरे येथे पहिला रूग्ण व दि. २१ रोजी शिनोली येथे दुसरा रूग्ण मिळाल्याने आता तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या पाच झाली आहे.    

आंबेगाव तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे आदिंनी संबंधित गावांना भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.