action on man not wearing mask

मास्क न वापरणाऱ्या बेशिस्त नागरिकांंकडून कोट्यावधीचा दंड वसूल करण्यात आला आहे. पिंपरी - चिंचवड पोलीस विभागामार्फत मास्क सक्तीबाबत दंडात्मक कारवाई करून जमा झालेल्या १०० टक्के महसुलापैकी ५० टक्के महसुल पिंपरी - चिंचवड महापालिकेस आणि ५० टक्के महसुल पिंपरी - चिंचवड पोलीस खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महापालिका सभेने मान्यता दिली आहे.

     

    पिंपरी : कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्यास पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाबरोबरच पिंपरी – चिंचवड पोलिसांकडूनही मास्क न वापरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून मास्क सक्तीबाबत दंडात्मक कारवाई करून जमा झालेल्या महसुलापैकी ५० टक्के महसुल पिंपरी महापालिकेस आणि ५० टक्के महसुल पिंपरी – चिंचवड पोलीस खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.

    कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या. त्याचबरोबर अनेक नियमही बनवले. त्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, न थुंकणे असे नियम लागू केले. नियमांचे उल्लंघन केल्यास महापालिका प्रशासनाबरोबरच पिंपरी – चिंचवड पोलीसही संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करू लागले. कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत १५ पोलीस स्टेशन, तीन पोलीस चौकी आणि १० वाहतूक विभागामार्फत कोरोना संकटकाळात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

    त्यामध्ये मास्क न वापरणाऱ्या बेशिस्त नागरिकांंकडून कोट्यावधीचा दंड वसूल करण्यात आला आहे. पिंपरी – चिंचवड पोलीस विभागामार्फत मास्क सक्तीबाबत दंडात्मक कारवाई करून जमा झालेल्या १०० टक्के महसुलापैकी ५० टक्के महसुल पिंपरी – चिंचवड महापालिकेस आणि ५० टक्के महसुल पिंपरी – चिंचवड पोलीस खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महापालिका सभेने मान्यता दिली आहे.