सामाईक विहिरीच्या वादातून भावकीत हाणामारी

शिक्रापूर : येथील दिघेवस्ती येथे राहणाऱ्या दोन जणांमध्ये भावकीतील सामाईक विहिरीच्या वादातून झालेल्या भांडणातून हाणामारी झाली असून पाच जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

 शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पाच जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

 शिक्रापूर : येथील दिघेवस्ती येथे राहणाऱ्या दोन जणांमध्ये भावकीतील सामाईक विहिरीच्या वादातून झालेल्या भांडणातून हाणामारी झाली असून पाच जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. शिक्रापूर (ता. शिरूर)  येथील दिघेवस्ती येथे काळूराम दिघे व बबन दिघे यांच्या शेतात सामाईक विहीर असून त्यांच्या शेतातील सामाईक विहिरीवरून वाद झाला आणि वादाचे पडसाद भांडणात होऊन दोघांमध्ये भांडणे झाली यावेळी एकमेकांना विळ्याने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केल्याचे दोघांनी फिर्यादीत म्हटले असून दोघांनी देखील शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी गुन्हे दाखल केल्याने काळूराम बंडू दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी रावसाहेब बबन दिघे, सुवर्णा रावसाहेब दिघे, शिवम रावसाहेब दिघे सर्व (रा. दिघे वस्ती शिक्रापूर ता. शिरूर जि पुणे ) यांच्या विरुद्ध तर बबन रामजी दिघे यांनी दिलेल्या काळूराम बंडू दिघे, विशाल काळूराम दिघे दोघे (रा. दिघे वस्ती शिक्रापूर ता. शिरूर जि पुणे)  यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण व पोलीस नाईक अनिल जगताप हे करत आहे.